शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुण्यात वीज कोसळून दोघांचा बळी

By admin | Updated: June 2, 2016 00:30 IST

बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन

पुणे : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन भागातील विधानभवन परिसरात घडली. गौतम लक्ष्मण वीर (वय ५०, रा. सेंट्रल गव्हर्न्मेंट कॉलनी, आकुर्डी) व बालय्या मार्क सिडतल्ला (वय ६२, रा. घोरपडी) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्याने जात असलेले गौतम आणि बालय्या हे दोघेही विधानभवनाजवळील एका झाडाखाली थांबले. पोलीस चौकीशेजारीच असलेल्या या झाडावर अचानक वीज पडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघाजणांना तातडीने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांना दोघांच्याही खिशातील कागदपत्रांमधून तसेच मोबाइलमधून नातेवाइकांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांशी संपर्क साधला. रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांचेही नातेवाईक जमा झाले होते. (प्रतिनिधी)