शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

डीपी मंजूर भागासाठी एनए प्रक्रिया सोपी

By admin | Updated: June 16, 2017 04:58 IST

रहिवासी आणि औद्योगिक विकासकामांना गती मिळावी यासाठी अकृषिक परवानगीचे (एनए) सुलभीकरण केले आहे. विकास आराखडा (डी.पी.) अंतिमरीत्या मंजूर

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रहिवासी आणि औद्योगिक विकासकामांना गती मिळावी यासाठी अकृषिक परवानगीचे (एनए) सुलभीकरण केले आहे. विकास आराखडा (डी.पी.) अंतिमरीत्या मंजूर करून प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित परिसरातील कामांसाठी पुन्हा अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. रूपांतरित कर, अकृषिक आकारणी यांसह इतर शासकीय करांचा भरणा केला असल्यास त्या जमिनीवर विकासकामे करण्याची मुभा विकसकांना राहणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये कलम ४२ ब व ४२ क ही समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासंदर्भात ५ जानेवारी २०२७ रोजी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. अध्यादेशात नमूद केलेल्या आदेशानुसार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या जमिनीबाबत एकदा जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची अकृषिक परवानगी घेतल्यानंतर तसेच नियमानुसार सर्व प्रकारे शुल्क भरल्यानंतर पुन्हा संबंधित जागा एनए करून घेण्याची आवश्यकता नाही. भरणा केलेले चलन किंवा पावती जमिनीला अकृषिक वापरामध्ये रूपांतरित करण्यात आले असल्याबद्दलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित महसूल परिषदेत स्पष्ट केले.राज्याचे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले, ‘‘डीपी मंजूर भागातील अकृषिक जागेसाठी रूपांतरित कर, अकृषिक आकारणी आणि नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर भरणा केलेली पावतीच एन.ए. म्हणून गृहित धरावी, अशी सुधारणा गेल्या पाच महिन्यांपूर्वी केली आहे. मात्र, अद्याप त्याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या अकृषिक जमिनीसाठी पुन्हा तलाठ्याकडून अकृषिक परवानगी (एन.ए.) घ्यावी लागते. तसेच एन.ए. म्हणून नोंद झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून ‘सनद’ घ्यावी लागते. मात्र, सुधारित कायद्यानुसार विकास आराखडा मंजूर अकृषिक जमिनीसाठी पुन्हा एन.ए. ची परवानगी नाही. त्यामुळे डी.पी. मंजूर भागातून ‘सनद’सुद्धा हद्दपार होणार आहे.’’विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या अकृषक जमिनींना पुन्हा एन.ए. घेण्याची आवश्यकता नाही, असे झाले तर संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी केली जाऊ शकतात, यांसारखे मुद्दे परिषदेत काही अधिकाऱ्यांनी मांडले. त्यावर महसूल विभागाकडे केवळ एन.ए. देण्याचे काम आहे. संबंधित ठिकाणी कोणत्या प्रकारचे बांधकाम उभे राहते, हे पाहणे इतर संस्थांचे काम आहे. त्यामुळे शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाचे काळजीपूर्वक वाचन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये याबाबत माहिती व्हावी, यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी द्यावी,असेही त्यांनी सांगितले.मूल्यांकन शुल्क : फेरफारासाठी पुरावाही ग्राह्यविकास आराखड्यामंध्ये मंजूर जमिनीस दोन वेळा अकृषिक परवानगीची गरज नाही. परंतु, त्यासाठीचे संबंधित जमिनीचे मूल्यांकन शुल्क भरावे लागणार आहे. त्याची पावती सातबारामधील फेरफारसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल. तसेच बँकांमध्येसुद्धा ‘अकृषिक सनद’ देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आवश्यक अध्यादेश शासनाकडून प्रसिद्ध केला जाईल. परंतु, उद्योजकांना बँकांकडून कर्ज घेताना अकृषिक सनद सादर करावी लागेल. अनधिकृत बांधकामे होऊ नये, आदिवासी जमीन, ‘वर्ग २’ मधील जमिनींवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी उद्योजकांना ही सनद बँकेत सादर करावी लागेल, असे महसूल परिषदेत स्पष्ट करण्यात आले.पुणे विभागातील अंतिम विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या ८६ हजार १४ स.नं./ गट क्रमांकांची अकृषिक आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यातील केवळ १४१ अकृषिक आकारणी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे विभागातील एकूण ८६ हजार १४ मधील पुणे जिल्ह्यात ११ हजार ८९५ अकृषिक आकारणी करावयाची आहे.