शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागाची माेजणी पूर्ण झाल्यावरच पूर्व भागाची मोजणी सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने १७३ किलोमीटर रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू आहे. पुण्याच्या पश्चिम भागात ...

पुणे : पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने १७३ किलोमीटर रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू आहे. पुण्याच्या पश्चिम भागात जमीन मोजणीचे काम सुरू आहे. पश्चिम भागातील जवळपास ७० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ३० टक्के येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्व भागातील जमीन भूसंपादनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीचे उपअभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.

पूर्व भागातील जमीन भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये चिंबळी, कुरुळी आदी गावांतील जमीन मोजणीला सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, एमएसआरडीसीने पश्चिम भागातील जमिनीचे आधी भूसंपादन पूर्ण करण्याचे ठरवले आहे. ७० टक्के भूसंपादन झाले असून उर्वरित ३० टक्के जमिनीचे भूसंपादन युद्धपातळीवर करण्याचे आदेश अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतरच पूर्वभागातील भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणर असल्याचे उपअभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.

पश्चिम भागातील रिंगरोडसाठी रांजे, कुसगव, मोरदरवाडी, घेरा सिंहगड, खामगाव मावळ, वरदाडे, मालखेड, मांडवी बुद्रूक, सांगरून, कातवडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, मातेरेवाडी, घोटावडे, रिहे, पडळघरवाडी, जावळ, खेमसेवाडी आणि पिंपलोळी या गावातील ७० टक्के मोजणी पूर्ण झाली आहे.

कोट

रिंगरोडसाठी शासन शेतकऱ्यांना मोबदला पाचपट देण्याचा निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेक गावांतील शेतकरी भूसंपादनाला सहकार्य होत आहेत. पश्चिम भागातील ७० टक्के मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित भूसंपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

- संदीप पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

पॉइंटर्स

* एमएसआरडीसीच्या रिंगरोडची एकूण लांबी :- १७३ किलोमीटर

* रिंगरोडसाठी लागणारी एकूण जमीन :- १५७५ हेक्टर

* रिंगरोड उभारणीचा एकूण खर्च :- १७ हजार कोटी रुपये

* भूसंपादनाची आतापर्यंत एकूण टक्केवारी :- ७० टक्के