शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनमध्ये डेंगीच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: November 15, 2015 00:46 IST

उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची भीती दाखवून खाजगी दवाखाने, रुग्णालये व रक्त लघवी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा अवाच्या सवा आकारणी करून करीत असलेल्या लुबाडणुक करीत आहेत़ या च्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय उरुळी कांचन बंदचे आयोजन करण्यात आले आहे़ राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सर्व स्तरावरील आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ गावातील राममंदिरापासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे़ हा मोर्चा संपूर्ण गावातून फिरुन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येईल़ तेथे निषेध सभा होऊन ठप्प प्रशासनाविरुद्ध आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांनी दिली. उरुळी कांचन गावात डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून घरटी किमान एक तरी व्यक्ती या रोगाने बाधीत झाली आहे़ घाणीचे साम्राज्य व पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाईमुळे उरुळी कांचन येथे डेंगीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की आज दुपारी मला याबाबतची माहिती मिळाली आहे, या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून तातडीने सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत. डेंगी या जीवघेण्या आजाराचे रुग्ण उरुळी कांचन मधील तुपे वस्ती, डाळिंब रोड, आश्रम रोड व गावाचा मध्यवर्ती भाग व महात्मा गांधी विद्यालय रस्ता अशा परिसरात झपाट्याने वाढत आहेत मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन कासव गतीने चालत असून यावरील तातडीच्या उपाय योजना करण्यात अपयशी ठरल्याची खंत माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांनी व्यक्त केली आहे़