शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

दौंड-कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

By admin | Updated: September 12, 2014 03:28 IST

दमदार पावसाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्या, तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

कुरकुंभ : दमदार पावसाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्या, तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दौंड-कुरकुंभ हा रस्ता बारामती, नगरला जोडणारा मुख्य राज्यमार्ग आहे. या रस्त्यावरील वाहतूक २४ तास चालू असते. कुरकुंभ औद्योगिक कारखाने व नगर, बारामती येथील औद्योगिक वाहतूक याच प्रमुख्य रस्त्यावरून होत असते. तसेच, औद्योगिक कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मोठी वर्दळ असते. त्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या रस्त्यावरून प्रवास करताना कित्येक दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहे. कुरकुंभ परिसर, कुरकुंभ घाट, भागवतवस्ती, गोळीबार मैदान, वनविभागातून जाणारा रस्ता या विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे परिसरातून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कामगारांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुरकुंभ येथे फिरंगाई देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातून तसेच राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच, दौंड येथून भाविक पायी चालत कुरकुंभपर्यंत येत असतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)