शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

वाळूमाफियांना दणका

By admin | Updated: October 23, 2016 03:43 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर चोरट्या वाळूच्या वाहतुकीवर दौंड महसूल विभागाने धडक कारवाई करून तब्बल २५ वाळूचे ट्रक पकडले आहेत. पुरंदर महसूल विभागाचे प्रांत

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावर चोरट्या वाळूच्या वाहतुकीवर दौंड महसूल विभागाने धडक कारवाई करून तब्बल २५ वाळूचे ट्रक पकडले आहेत. पुरंदर महसूल विभागाचे प्रांत अधिकारी संजय असवले, दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर चोरट्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. यातील काही ट्रकमध्ये वाळूच्या गोण्या भरून वाळू मुंबई येथे नेली जात होती. त्यानुसार मागील ३ दिवसांत महसूल विभागाने रात्रभर महामार्गावरील वाळूवाहतुकीवर लक्ष ठेवून वाळूची वाहतूक करणारे ट्रक पकडले.यवत, केडगाव व राहू मंडल अधिकारी व सर्व तलाठी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मागील काही दिवसांत १६ वाळूवाहतुकीची वाहाने महसूल विभागाने पकडली होती. काल (दि. २१) मध्यरात्री सहजपूर (ता. दौड) गावाच्या हद्दीत एका ढाब्यावर चोरट्या वाळूवाहतुकीची वाहने मोठ्या संख्येने थांबली असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला, त्या वेळी तेथे ९ वाळूवाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या ९ ट्रकपैकी ७ ट्रक मोठ्या कंटेनरच्या आकाराचे आहेत. यात वाळू सिमेंटच्या गोण्यांमध्ये भरलेली आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व ट्रक ताब्यात घेतले आहेत. वाहनांच्या चालकांकडे महसूल भरल्याची पावती नाही. यामुळे ही सर्व वाळू चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती या वेळी महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली. वाळूवाहतुकीवर प्रत्येक ब्रासला २६ हजार याप्रमाणे लाखो रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.(वार्ताहर)वडगावला अवैध वाळूचोरीदेऊळगावराजे : वडगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस राजरोसपणे अवैध वाळूचोरी होत आहे. याकडे दौंड महसूल विभाग कानाडोळा करीत आहे, असा आरोप येथील नागरिक करत आहे. वडगाव येथून दररोज अंदाजे २० ते २५ ट्रक वाळूचोरी होत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. देऊळगावराजे ते वडगावदरेकर या पाच किमीच्या रस्त्याची या अवैध वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. वाळूचोरीमुळे नदीपात्राचे स्वरूप बदलले आहे. या वाळूचोरीला महसूल विभागाने वेळीच आळा बसवणे गरजेचे आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार विवेक साळुुंखे व त्यांच्या पथकाने पेडगाव येथे चार यांत्रिक बोटींना जलसमाधी देण्यात आली. शिरापूर येथे ट्रक पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे. मात्र, वडगाव येथे वाळूचोरीला आळा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांपुढे येत आहे. याबाबत तहसीलदार विवेक सांळुखे म्हणाले, की वाळूचोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. सोलापूर जिल्ह्यातील वाळू थेट मुंबईकडेसद्य परिस्थितीत वाळूला सोन्याचा भाव आहे, असे बांधकाम क्षेत्रात म्हटले जाते. त्याला कारणही तसेच आहे. सद्य परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील वाळूचे लिलाल झालेले नाहीत. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस हे लिलाव होणार आहेत. यामुळे अवैध व चोरट्या पद्धतीने वाळू काढण्याचे धंदे जोमात आहेत. नदीतील वाळू इमारतींसाठी प्लास्टरसाठी गरजेची असते. बांधकामासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातून थेट मुंबईपर्यंत वाळू पोहोचवली जात आहे. महसूल विभागाला मिळणार लाखोंचा दंड....पुणे-सोलापूर महामार्गावर पकडलेले चोरट्या वाळू वाहतूकीचे तब्बल २५ ट्रक यवत येथे महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. या ट्रकमध्ये अंदाजे १०० ब्रासपेक्षा कितीतरी अधिक वाळू असल्याचा अंदाज आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार आता शासनाचा महसूल बुडवून चोरीची वाळू वाहतूक केल्यास प्रत्येक ब्रासला २६ हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. यवतमध्ये केलेल्या कारवाई मधून शासनाला लाखो रुपयांचा दंड मिळणार आहे.