शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांनी अनुभवले द.मां.चे कथाकथन!

By admin | Updated: June 27, 2017 07:59 IST

‘मूक चित्रपट पंढरपूरला पाहायचो. लढाई असली की तबला, पेटी यावर आवाज काढले जायचे, हे बघण्यात मोठा आनंद होता. प्रभातच्या ‘गुरुदेव दत्त’

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘मूक चित्रपट पंढरपूरला पाहायचो. लढाई असली की तबला, पेटी यावर आवाज काढले जायचे, हे बघण्यात मोठा आनंद होता. प्रभातच्या ‘गुरुदेव दत्त’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात दत्तापुढे गाय, कुत्रे होते. स्टार्ट म्हटले की कुत्रे उठून जायचे. दोन तास हा गोंधळ चालल्यानंतर एक कामगार जिमखान्यावर जाऊन मटण घेऊन आला व त्याने ते कुत्र्याच्या पुढे ठेवले. त्यानंतर कुत्रे उठले नाही आणि शॉट ओके झाला,’ असे एकाहून एक किस्से खुमासदार शैलीत रंगवत द. मा. मिरासदार यांनी रसिकांची संध्याकाळ हसरी केली.दमांच्या नव्वदीनिमित्त द. मा. मिरासदार प्रतिष्ठान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे आयोजित मराठी विनोदी चित्रपट महोत्सवाचा समारोप सोमवारी झाला. या वेळी उद्योजक विनित गोयल, मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, आशयचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. या वेळी राजा परांजपे, विश्वास सरपोतदार, दादा कोंडके, स्मिता तळवलकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.द. मा. म्हणाले, ‘एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दिग्दर्शकाशी भांडण झाल्याने अभिनेत्री निघून गेली. लेखकाच्या सल्ल्याने एका डमी अभिनेत्रीला घेण्यात आले. पाठमोरी चालताना तिचा साधूला धक्का लागतो. साधू संतापतो आणि अब तुम कुत्ती बन जाओगी, असा शाप देतो. ती कुत्री होते. आजूबाजूचे लोक क्षमायाचना करतात. म्हणून साधू पुन्हा तिला स्त्री रूपात आणण्यासाठी तयार होतो; पण आता तिचे रूप बदलेल, असे साधू सांगतो आणि दुसऱ्या अभिनेत्रीच्या पदार्पणाने चित्रपट पुढे सरकतो...’ सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.