शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन घटल्याने शेणखत झाले दुर्मिळ

By admin | Updated: June 14, 2014 01:52 IST

मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे

कामशेत : मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर शेतकरी जास्त करू लागले आहेत. मावळात लोणावळा, तळेगाव, देहूरोड ही शहरे सोडून सुमारे दीडशेहून अधिक गावे आहेत. सध्या तालुक्यात सुमारे १५ ते २० हजार एवढीच जनावरे आहेत. गावागावातून मागील २० वर्षांपासून असणारी जनावरांची लाखोंची संख्या कमी झाली आहे. जनावरांना चरण्यासाठीच्या गायरान, गायचरण, माळरानांची विक्री झाली. तेथे इमारती उभ्या राहिल्याने जनावरे पाळणेही कठीण झाले आहे. सुमारे ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे घरगुती दुग्ध उत्पादनासाठी गाय किंवा एखादी म्हैस आहे. कामासाठी एक बैलजोडी आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ५०, १०० जनावरांचा कळप अन् गोठाही काळाच्या ओघात नाहीसा झाला. पशुधनातून लेंडीखत मिळवून देणाऱ्या शेळ्याही कमी झाल्या आहेत. लेंडीखत व गाय, म्हैस, बैलापासून मिळणारे शेणखतही पूर्णपणे कमी झाले आहे. शेणखताचे उकिरडे, शेणकई आता दिसत नाही. शेतकरी घरासमोर खोल खड्डा खोदून त्यात शेण, लेंडीची साठवणूक करतात. गोठ्यातील वैरणीचा कचरा, घरगुती कचरा, यापासून वर्षभर या खड्ड्यात शेणखत तयार होते. आता मात्र शेणखत एका गावात पाच-सहा शेतकरीच तयार करतात. काही शेतकरी हे खत विकतातही. सध्या शेणखत २५०० रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने विक्री होत आहे. मात्र, तरीही खेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे भात, भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात थेट रासायनिक खतांचा वारेमाप वापर सुरू केला आहे. यामुळे जमिनीचा पोतही खराब होतो. अन् उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खते शेतीला घातक ठरत आहेत.याबाबत कृषिअधिकारी पुरुषोत्तम वाणी म्हणाले, ‘‘जैविक खतनिर्मितीसाठी शासन अनुदान देते. परंतु, त्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. शेणखताची उपलब्धता कमी झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. (वार्ताहर)