शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रश्नावरून महापालिकेत जोरदार गोंधळ

By admin | Updated: April 20, 2017 07:04 IST

‘पुणेकरांना कचऱ्याचा त्रास, भाजपाला खुर्चीचा ध्यास’, ‘कचरा प्रश्न पेटला असताना परदेशवारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो’, अशा जोरदार

पुणे: ‘पुणेकरांना कचऱ्याचा त्रास, भाजपाला खुर्चीचा ध्यास’, ‘कचरा प्रश्न पेटला असताना परदेशवारी करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी कचऱ्याच्या प्रश्नावर बुधवारी (दि.१९) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ घातला. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संधी द्यावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सत्ताधारी भाजपा काही वेळ हतबल झाला व सभा तहकूब करण्याची तयारी केली. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर खास सभा घेण्याची व विरोधकांना चर्चा करण्याची संधी दिली.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने गेल्या पाच दिवसांपासून शहरात कचऱ्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा डेपोतील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. यामुळे सध्या शहराच्या विविध भागांत कचरापेट्या भरून वाहत असून, नागरिकांच्या आरोग्याबाबतीत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी फ्लेक्सबाजी करत सभागृहात कचरा आणला व सत्ताधारी भाजपाचा धिक्कार केला. महापौर मुक्ता टिळक सभागृहात आल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामध्ये काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे, वसंत मोरे, योगेश ससाणे, अविनाश बागवे, संजय भोसले यांनी शहरात कचरा प्रश्न पेटला असताना प्रशासन झोपा काढतेय का, असा सवाल उपस्थित केला. महापौरांनी प्रशासनाच्या वतीने घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांना कचरा प्रश्नावर खुलासा करण्यास सांगितले. यावर अगोदर सदस्यांना कचरा प्रश्नावर चर्चा करण्याची संधी द्या, नंतर अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत कचऱ्याची सद्यस्थिती समजण्यासाठी अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश महापौरांनी दिले. यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले कचराप्रश्नावर चर्चा टाळणाऱ्या महापौरांचा धिक्कार, अशा घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतले.