पुणे : आर्थिक वर्षाची अखेर असल्यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजार स्थिर होता.किरकोळ अपवाद वगळता बहुतेक वस्तूंच्या किमतीत बदल झाला नाही. आवक असूनही मागणी कमी असल्याचे चित्र सर्वत्र होते.इतर देशांतून आवक होत असल्याने शेंगदाणा, खोबरा आणि सूर्यफूल तेल वगळता सलग दुसऱ्या आठवड्यात तेलदर घसरले. सरकी, सोयाबीन, पामतेल १५ ते २० रुपयांनी स्वस्त झाले. तांदळाची आवक चांगली असून खरेदीही बऱ्यापैकी होत असल्याने भाव स्थिर आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने गहू आणि ज्वारीची आवक थोडी मंदावली. दोहोंचे दर स्थिर असून पुढील आठवड्यातदेखील हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मसूर आणि उडीद डाळीच्या दरामध्ये १०० ते २०० रुपयांची वाढ वगळता डाळी आणि कडधान्याचे दर ‘जैसे थे’ होते. बेसनाला मागणी नसल्याने याच्या दरात ३० ते ४० रुपयांनी घट झाली. नारळाची आवक आणि मागणी व्यवस्थित असल्याने दरही स्थिर आहेत. घाऊक भाव पुढीलप्रमाणे : खाद्यतेलांचे भाव (१५ किलो/लिटरचे भाव) : शेंगदाणा तेल १४५०-१५२५, रिफार्इंड तेल १४५०-१७००, सरकी तेल ८६०-१०२०, सोयाबीन तेल ९६०-१०४०, पामतेल ८२५-९१०, सूर्यफूल रिफार्इंड तेल ९९०-११००, वनस्पती तूप ७५०-९८०, खोबरेल तेल २२५०.क्विंटलचे भाव : लहान साखर (एस) २४००-२४५०. गूळ : गूळ नंबर १ : २४५०-२५५०, गूळ नंबर २ : २३२५-२४२५, गूळ नंबर ३ : २२२५-२३००, गूळ नंबर ४ : २१२५-२१७५, एक्स्ट्रा : २६५०-२८२५, बॉक्स पॅकिंग : २४००-२८००.तांदळाचे भाव : उकडा २७००-२८००, मसुरी २७००-२८००, सोनामसुरी २८००-३०००, कोलम ४५००-४८००, चिन्नोर ३२००-३५००, सुरती कोलम : ४५००-५०००, ११२१ : ८५००-९०००, आंबेमोहोर ५०००-६०००, बासमती अखंड ८५००-९०००, बासमती दुबार : ६५००-७०००, बासमती तिबार ७५००-८०००, बासमती मोगरा ४०००-४२००, बासमती कणी २४००-२६००, सरबती ४५००-५०००, सेला बासमती ५०००-६५००,गहू : सौराष्ट्र लोकवन २६००-२८००, मध्य प्रदेश लोकवन १९५०-२४५०, सिहोर ३२००-३६००, मिलबर १९००-१९५०, ज्वारी : गावरान ३३००-३७००, दूरी १८५०-२०००, वसंत : १६००-१८००, बाजरी : महिको १८००-२०००, गावरान : १६००-१८००, हायब्रिड १४००-१५००.डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ ७८००-८८००, हरभरा डाळ ४५००-५०००, मूगडाळ ९५००-१०,५००, मसूरडाळ ६३००-६५००, उडीदडाळ ८४००-९०००, मटकीडाळ ८५००-८८००, कडधान्ये : हरभरा ४०००-४२००, हुलगा २९००-३०००, चवळी ५०००-६५००, मसूर ५४००-५५००, मूग गावरान ६८००-७८००, मुग पॉलिश ८८००-९२००, मटकी ७६००-७८००, वाटाणा : पांढरा २७००-२८००, हिरवा ३४००-५०००.साबुदाणा : साबुदाणा नंबर १ : ६०००, नंबर २ : ५३००, नंबर ३ : ५६००, भगर ६५००-६८००, हळद पावडर (१० किलो) : ९५०-१४५०, अख्खी हळद (१० किलो) : १०००-१५००.शेंगदाणा : स्पॅनिश ७५००-७८५०, घुंगरू७०००-७२००, जाडा ६५००-७२००. मिरची : ब्याडगी ढब्बी १७,०००-१८,०००, ब्याडगी १ १३,५००-१४,५००, ब्याडगी २ : ११,५००-१२,५००, खुडवा ब्याडगी ५०००-६०००, खुडवा गुंटूर ६०००-७०००, गुंटूर ८५००-९०००, धने : गावरान ८५००-९०००, इंदूर १०,०००-१२,०००.पोहा : मीडियम २६५०-२७००, मध्य प्रदेश ३२००-३४००, पेण पोहा २५५०-२६५०, दगडी पोहा २३००-२४५०, पातळ पोहा ३१००-३५००, सुपर पोहा २८५०-२९५०, भाजका पोहा (१२ किलो) ३५०-४००, भाजकीडाळ (४० किलो) २२४५-२३६०, मुरमुरा (९ किलो) भडंग ८००-८१०, राजनंदगाव ३६०, सुरती ३६०.गोटा खोबरे (१० किलो) : १६००-१६५०. नारळ (शेकड्याचा भाव) : नवा नारळ पॅकिंंग ११००-१२५०, मद्रास २२००-२३००, पालकोल जुना १४५०-१५००.रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) : रवा ११००-११५०, मैदा १०५०-११५०, आटा १०५०-११५०, बेसन (५० किलोस) २६२०-२६६०.(प्रतिनिधी) लोखंड ५०० रुपयांनी कमीलोखंडाला मागणी सध्या कमी असून पुरवठा मात्र, तुलनेत जास्त असल्यामुळे भावात घसरण झाली. मागील आठवड्यामध्ये लोखंडाच्या दरात प्रतिटन ७०० ते १००0 रुपयांनी वाढ झाल्यानंतर या आठवड्यामध्ये तो ५०० रुपयांनी घसरला. वीट, खडी, वाळू यांचे भाव स्थिर आहेत. सिमेंटच्या दरातही बदल झालेला नाही. मात्र, मार्चअखेर असल्याने १५ ते २० रुपये कमी किमतीत विक्री सुरू आहे.लोखंडाचे भाव (प्रति टन) : ६ एम.एम. ४३,५००, ८ एम.एम. ४३,०००, १० एम.एम. ४२,०००, १२ एम.एम. ४२,०००, १६ एम.एम. ४२,०००, २० एम.एम. ४२,०००, २५ एम.एम. ४२,०००. वीट (१ हजार) सहा इंची : ९०००, चार इंची ७०००, फ्लाय अॅश वीट (१ हजार) : सहा इंची ८५००, चार इंची ७०००, वाळू (१ ब्रास) : नदीची वाळू ७०००, खडीची वाळू ३१५०, खडी : पाऊण इंची २६००. सिमेंट (५० किलो) : ४३ ग्रेड : ३४५-३५०, ५३ ग्रेड : ३५०-३५५.
मार्चअखेरमुळे भुसार बाजार स्थिर
By admin | Updated: March 22, 2015 23:01 IST