शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जागा निश्चित न झाल्यामुळे माळीणचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: July 27, 2015 03:33 IST

माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे

घोडेगाव : माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे माळीण पुनर्वसनाची जागा लवकर निश्चित झाली नाही. प्रशासनाने जागा शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला; मात्र आवश्यक आठ एकर जागा व ग्रामस्थांच्या सोयीची जागा लवकर न मिळाल्याने पुनर्वसन रखडले आहे. दि. ३० जुलै २०१४ रोजी माळीण येथे अतिवृष्टीमुळे गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये ४४ कुटुंबांतील १५१ लोक मरण पावले. या दुर्घटनेत पूर्ण घरे गाडली गेली. यातूनही सुदैवाने वाचलेल्या लोकांचे तात्पुरते पुनर्वसन तातडीने करण्याची आवश्यकता होती. यासाठी माळीण फाट्यावरील शाळेच्या पटांगणावर ४० तात्पुरती निवारा शेड बांधून येथे व्यवस्था करण्यात आली. तात्पुरता निवारा झाला; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा शोधून तातडीने पक्की घरे बांधणे हे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. हा आदिवासी व दुर्गम भाग असल्याने येथे पडीक जागा भरपूर असतील व जागा मिळून जाईल, असा प्रशासनाचा समज होता. पहिल्या टप्प्यात आडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहण्यात आल्या. आडिवरे जागेला माळीण ग्रामस्थांनी सहमतीदेखील दिली; मात्र आडिवरे ग्रामस्थांनी जागा देण्यास तीव्र विरोध केला. सष्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी व कोकणेवाडीच्या जागेला जागामालकांनी संमती दिली. यातील झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली. प्रशासनालादेखील ही जागा आवडली; मात्र ती उंच डोंगरावर असल्याने दळणवळणास, शेतीकडे जाण्यास अवघड होईल, म्हणून माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला. कोकणेवाडीची जागा लांब असल्याने या जागेला कोणीच पसंती दिली नाही. यानंतर घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत माळीण पुनर्वसनाची जागा ग्रामस्थांना विचारात घेऊनच निश्चित केली जाईल, कोणतीही जागा लादली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.या वेळी ग्रामस्थांनी तात्पुरती निवारा शेड असलेल्या कशाळवाडीच्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली.