शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘औषधांची नशा’

By admin | Updated: October 28, 2015 01:19 IST

पुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे

लक्ष्मण शेरकर, ओझरपुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे. चोरट्या मार्गाने बॅन केलेली (बंदी घातलेली) औषधे आणली जात असून, औषध माफिया चौपट किमतीला ती तरुणांना विकत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. लोकमत प्रतिनिधीने या प्रकरणाचा शोध घेतला असता, ग्रामीण भागात अनेक तरुण छुपेपणाने हे औषध काळ््याबाजारातून विकत घेत आहेत. केवळ मेडिकलमध्येच नव्हे, तर काळाबाजार करणारे औषध माफिया चौपट किंमत आकारून तरुणांना नव्या व्यसनाच्या आहारी नेत आहेत. नशा करण्याचे नवनवीन प्रकार नशेबहाद्दर शोधून काढतच असतात. आता खोकल्याचे औषध व झोपेच्या गोळ्या यांचा वापर नशा म्हणून करण्याचे प्रमाण वाढत आहे. औषधांच्या या काळ्याबाजारामुळे औषध माफियांचा धंदा हळूहळू ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट रोवू लागला आहे. औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची ‘कोरेक्स किंग’ अशी नवी ओळख ग्रामीण भागात निर्माण होत आहे. शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातील तरुणही या व्यसनांच्या आहारी जात आहेत.कोरेक्सच्या ५० मिलि बाटलीची किंमत ५७ रुपये, १०० मिलि बाटलीची किंमत ९० रुपये आहे. तसेच, रेस्टिल या ०.२५ एमजीच्या १५ गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १५ ते १६ रुपये आहे. हे तिप्पट किमतीला, तर कोरेक्सची बाटली २०० रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकली जाते.औषधांची नशा अत्यंत घातकया गंभीर समस्येबाबत जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष डॉ. संजय वेताळ म्हणाले, ‘‘डॉक्टरांच्या चिठीशिवाय ही औषधे दिलीच जाऊ नयेत. इतर कोणत्याही नशेपेक्षा या औषधांची नशा अत्यंत घातक असते. सध्या आॅनलाईन औषधखरेदीमुळे या गोष्टीला पायबंद बसण्याऐवजी अधिक फोफावण्याची भीती आहे. ड्रग अ‍ॅडिक्शन ही समस्या अशा औषधांच्या वापरामुळे शहराकडून खेड्याकडेसुद्धा पसरत चालली आहे.’’डॉक्टरांचेच प्रिस्क्रीप्शन चोरीला?जुन्नर, आंबेगाव व खेड केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय चोरडिया म्हणाले, ‘‘जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील औषधविक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे देत नाहीत; परंतु औषधांचा काळाबाजार करणारे व नशेबाज तरुण डॉक्टरांची प्रिस्क्रीप्शनच चोरतात व डॉक्टरांची चिठी, पॅड चोरून त्यावर या औषधांची नावे लिहून डॉक्टरांची खोटी सही करून औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.’’ लक्झरी बसमधून येतात औषधेही औषधे बाहेरच्या राज्यातून लक्झरी बस, ट्रक याद्वारे रात्री-अपरात्री महाराष्ट्रात येतात. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात हे लोण पसरत आहे ही खेदाची बाब आहे, अशी माहिती सहायक आयुक्त एन. टी. सुपे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भिवंडी, मुंब्रा, गोवंडी या ठिकाणी यापूर्वी चोरट्या मार्गाने औषधविक्री करणाऱ्या औषधविक्रेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ही औषधे शेड्यूल्ड एच १ या प्रकारात येत असून, डॉक्टरांच्या चिठीशिवाय त्यांची विक्री करायची नाही, असा कायदा आहे. परंतु, ड्रग इन्स्पेक्टरला या चोरट्या मार्गाने येणाऱ्या औषधांबाबत माहिती मिळत नाही, तसेच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी या गोष्टींचा छडा लावणे अवघड जाते.’’