शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक दिलावरखान मशिदीची पडझड

By admin | Updated: May 9, 2017 03:20 IST

राजगुरुनगर येथील ऐतिहासिक दिलावर खान मशिदीची पडझड होऊ लागली आहे. वास्तूचे दगड सुटून पडल्याने संपूर्ण इमारतीला

लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : राजगुरुनगर येथील ऐतिहासिक दिलावर खान मशिदीची पडझड होऊ लागली आहे. वास्तूचे दगड सुटून पडल्याने संपूर्ण इमारतीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. दुर्लक्षित होत चाललेल्या राजगुरुनगर येथील पुरातन वास्तूला शासनाने राष्ट्रीय ठेवा म्हणून जोपासत असताना मात्र त्याच्या संरक्षण व संवर्धनसाठी शासनस्तरावरच उदासीनता दिसून येत आहे.राजगुरुनगर येथे निजामशाही राजवटीतील दिलावरखान दर्गा व मशीद आहे. शासनाने या वास्तूला राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जोपासले असल्याने ही वास्तू पुरातन खात्याच्या ताब्यात आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वास्तू विकासापासून वंचित राहत असल्याने या वास्तूची पडझड होऊन त्याचे मूळ सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे.कळसाभोवती जंगली झाडेझुडपे उगवून वास्तूची नक्षीदार दगड सुटू लागले आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासाठी शासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु यादरम्यान फक्त कळसाचे काम झाले असून उर्वरित कामाला मात्र दुर्लक्षित केले गेले. त्यामुळे पावसाचे पाणी दगडी भिंतीतून आतमध्ये येत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. जवळच असलेल्या मशिदीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गेल्या पावसाळ्यात या मशिदीचा काही भाग सुटून त्याचे दगड पडले आहेत. संरक्षक भिंतीच्या दर्शनी बाजूला तार कंपाऊंड मोडकळीस झाल्याने अतिक्रमण होण्याची संभावना निर्माण झाली आहे.इतिहासाचा वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक पुरातन वास्तू इतिहासकाळाची आठवण देत गेली अनेक वर्षे नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही तग धरून आहेत. शासनाने या वास्तू राष्ट्रीय ठेवा म्हणून जोपासले आहेत. या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने कामे करून जिल्ह्यातील अनेक वास्तूंचे नूतनीकरण केले आहे. परंतु त्यामध्ये समाविष्ट असलेल्या राजगुरुनगर येथील दिलावरखान दर्गा व मशीद आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून दुरुस्तीअभावी या वास्तूची पडझड होत आहे. कळसाभोवतालचे दगड सुटून अचानक पडत असल्याने या वास्तूला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना धोका निर्माण झाला आहे.