शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

संधी नाकारणारा सी-सॅट नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

——————————————————--------------------------- यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत सी-सॅट या पेपरचा समावेश २०१३ पासून करण्यात आला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅटचे केवळ ...

——————————————————---------------------------

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत सी-सॅट या पेपरचा समावेश २०१३ पासून करण्यात आला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅटचे केवळ पात्रतेसाठी आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांमध्ये सी-सॅटचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या निकालात सी-सॅटचे गुण ग्राह्य धरले जातात. याचा फायदा वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावस्थापन या शाखेतील विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये वाढ होते. तर कला, वाणिज्य, कृषी या शाखांमधील उमेदवारांना सी-सॅटचा पेपर कठीण जात आहे. त्यामुळे त्यांना कमी गुण मिळतात.

सामान्य अध्ययन पेपर एक आणि दोन यांचे आयोग आणि उमेदवार यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे महत्त्व आहे. आयोगाला पेपर एकमधून उमेदवारांची माहिती आणि महत्त्वाच्या विषयांबाबतची सजगता तपासायची असते, तर पेपर दोनमधून उमेदवारांची आकलनक्षमता, तर्कक्षमता आणि व्यवस्थापकीय निर्णयक्षमता तपासायची असते. केंद्रीय लोकसेवा परीक्षेतही सी-सॅटचा पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर एमपीएससीनेही सी-सॅट पेपर सुरू केला. मात्र, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सी-सॅटचा पेपर उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हा पेपर केवळ पात्र करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे एमपीएससीने २०१९मध्ये सी-सॅट पेपरमध्ये यूपीएससीप्रमाणे बदल करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मात्र, या समितीने अद्याप कोणताही अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे हा विषय दोन वर्षांपासून रखडलेलाच आहे.

पुण्यातील शाम खरात या विद्यार्थ्याने सांगितले की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीमध्ये उत्तीर्ण होणारे ७० टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेतील आहेत. वर्ग-१ च्या परीक्षेतही याच शाखेतील उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. सी-सॅटमध्ये हे विद्यार्थी २०० पैकी १२०च्या पुढे गुण मिळवतात. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणे त्यांना सोपे ठरते. त्यामुळे एमपीएससीने सी-सॅट २०० गुणांऐवजी ६० ते ९० गुणांचेच ठेवावे आणि ते केवळ उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठीच असावे. पात्रतेसाठी सी-सॅटचे गुण ग्राह्य धरण्याचा अट्टहास एमपीएससीने सोडण्याची गरज आहे.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या राजेश बोनवटे या विद्यार्थ्याने सांगितले की, यूपीएससीने सी-सॅट हा पेपर केवळ पात्रतेपुरता मर्यादित ठेवला आहे. मात्र, एमपीएससीने पात्रतेसाठी सी-सॅटचे गुण ग्राह्य धरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. कारण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीईटी, व्यवस्थापन या शाखांमधील विद्यार्थी सी-सॅटमध्ये अधिकाधिक गुण मिळवतात. त्यामुळे ते मुख्य परीक्षेसाठी सहजपणे पात्र ठरतात. त्याचवेळी ईतर शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता असूनही त्यांना पूर्व परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. कारण हे विद्यार्थी पेपर एकमध्ये चांगले गुण मिळवतात. मात्र, सी-सॅटमुळे त्यांनी दुसऱ्या पेपरमध्ये अडचण होते. त्यामुळे क्षमता असूनही ते पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर फेकले जातात. त्यामुळे एमपीएससीचा हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. गुणवत्ता असूनही अनेकांना मुख्य परीक्षेपासून वंचित ठेवणारा हा सी-सॅटचा पेपर केवळ पात्र करण्याची गरज आहे.

कला शाखेतील अनेक विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे असतो. त्यामुळे पदवीच्या शेवटच्या वर्षापासूनच विद्यार्थी तयारी सुरू करतात. मात्र, कला शाखेची पार्श्वभूमी असल्याने सी-सॅटची तयारी करूनही त्यात सर्व गुण मिळवणे शक्य होत नाही. त्या उलट इतर शाखेतील विद्यार्थी सी-सॅटच्या तयारीमुळे या विषयात उत्तम गुण मिळवतात. सी-सॅटचे गुण ग्राह्य धरले जात असल्यामुळे आम्ही एमपीएससीची परीक्षा द्यावी की नाही? असा सवाल विद्यार्थी करत आहेत.

फोटो - एमपीएससी-सी-सॅट