शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

फुफ्फुसातला रोग डोक्यात जाऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST

माजी सैनिक रमेश अंबुसकर : आत्मबळ, एकत्र कुटुंबाचा पाठिंबा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे कोरोनावर मात पुणे : लसीचा पहिला डोस ...

माजी सैनिक रमेश अंबुसकर : आत्मबळ, एकत्र कुटुंबाचा पाठिंबा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे कोरोनावर मात

पुणे : लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सैन्यातून निवृत्त झालेले ६७ वर्षीय रमेश अंबुसकर यांना ताप, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागली. लस घेतल्यामुळे त्रास होत असेल, असे समजून सुरुवातीला घरगुती औषधे सुरू होती. नंतर चाचणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. एचआरसीटी स्कोअर १७, फुफ्फुसांना ६० टक्के संसर्ग, रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास अशा परिस्थितीत रमेशजी ४ दिवस व्हेंटिलेटरवर तर ९ दिवस ऑक्सिजनवर होते. मात्र, आत्मबळ, पत्नी, सर्व सूना व मुलांचा पाठिंबा आणि डॉक्टरांचे प्रयत्न या जोरावर त्यांनी कोरोनाविरोधातील युद्ध जिंकले. आजही तब्येतीची चौकशी करणाऱ्या प्रत्येकाला रमेश अंबुसकर ''फुफ्फुसातला रोग डोक्यात जाऊ देऊ नका'', असाच सल्ला देतात.

रमेश अंबुसकर यांच्या सर्वात लहान मुलाचे २८ फेब्रुवारी रोजी लग्न होते. रमेशजींना ५ मार्चला त्यांना लसीचा पहिला डोस दिला. सुरुवातीला ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागली. दोन दिवसानी तोंडाची चव गेली, प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांनी त्यांची टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली.

रमेश अंबुसकर यांचा मुलगा तुषार अंबुसकर यांनी ''लोकमत''ला सांगितले, '' वडिलांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता, खोकलाही खूप वाढला होता. एचआरसीटी स्कोअर १६ असल्याचे निदान झाले. फुफ्फुसांना ६० टक्के संसर्ग झाला होता. वडिलांना आयसीयूमध्ये हलवले. तब्येत ढासळत चालल्याने आणि ऑक्सिजन पातळी खालावल्याने व्हेंटिलेटर लावला. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता.''

वडिलांना कोरोना झाल्याचे आम्ही त्यांना कळू दिले नाही. तुम्हाला न्युमोनिया झाला असून त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होत आहे आणि औषधोपचार सुरू आहेत असे सांगितले, डॉक्टरांनाही तशीच विनंती केली. लहान भावाचा वडिलांवर फार जीव. त्यामुळे मी वडिलांबरोबर हॉस्पिटलमध्येच राहीन, असे त्याने ठरविले. डॉक्टरांना विनंती केल्यावर त्याला तिथे राहण्याची परवानगी मिळाली. आम्ही घरचे जेवण घेऊन जात होतो आणि मास्क, हॅन्डग्लोव्हज वापरून तो दररोज जेवू घालत होता. ते दिवस आमच्या सर्वांची परीक्षा पाहणारे होते. घरी आई, मोठा भाऊ आणि मोठी वहिनी यांनाही लक्षणे जाणवत असल्याने त्या तिघांनाही आयसोलेट केले. माझा मुलगा सव्वा वर्षाचा असल्याने त्याला काही त्रास होऊ नये म्हणून, माझ्या पत्नीचा आणि मुलालाही विलगीकरणात ठेवले. आठ दिवसांपूर्वीच लग्न होऊन आलेल्या नवीन नवरीने संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. नवीन जोडप्याला लग्नानंतर लगेचच या संकटाचा सामना करावा लागला.

चौथ्या दिवशी वडिलांची प्रकृती सुधारू लागली. त्यांना व्हेंटिलेटरवरून ऑक्सिजनवर शिफ्ट केले. मला काहीही होणार नाही, असा आम्हालाच ते धीर देत होते. १४ दिवसांनी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने जीव भांड्यात पडला. वडिलांना डिस्चार्ज मिळाला. वडील घरी आल्यानंतर बँड वाजवून, हार घालून आम्ही त्यांचे स्वागत केले.