शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर अभयारण्यात फिरकू नका, होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST

राज्य शासनाने कोरोनानिर्बंधात थोडी सूट दिल्याबरोबर लोक मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडू लागले आहेत व सध्या पावसाळा सुरू झाल्याने ...

राज्य शासनाने कोरोनानिर्बंधात थोडी सूट दिल्याबरोबर लोक मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडू लागले आहेत व सध्या पावसाळा सुरू झाल्याने पर्यटनस्थळांकडे मोठ्या संख्येने जात आहेत. शासनाने पर्यटनस्थळे धार्मिकस्थळे घडण्यास परवानगी दिलेली नाही तरीही लोक भीमाशंकर, माळशेज, हरिश्चंद्रगड गड, लोणावळा खंडळा, ताम्हिणी घाट, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी वर्षाविहारासाठी जात आहेत. अशा पर्यटकांच्या लोंढेच्या लोंढे या ठिकाणी दिसू लागले आहेत.

यातून कोरोना महामारीचा धोका आहेच तसेच या पर्यटनस्थळांवर धोकादायक पद्धतीने फिरून लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत. नुकतेच शिक्रापूर येथील लक्ष्मण लहारे हा २९ वर्षांचा युवक आपल्या मित्रांसोबत भीमाशंकर जंगलात फिरायला गेला. कोणताही अंदाज नसताना कोंढवळच्या धबधब्यात उतरला व येथे पाय घसरून पडला. या घटनेला सहा दिवस झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी एनडीआरएफ, पोलीस, वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ व इतर काही सेवाभावी संस्था यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्याचा अजूनही तपास लागला नाही.

पर्यटनस्थळांवर फिरण्याची परवानगी नसताना अशा प्रकारे कोंढवळच्या धबधब्यात उतरून या तरुणाने प्रशासना, स्थानिक ग्रामस्थांबरोबर व आपल्या कुटुंबीयांना देखील दु:खात लोटले. ही घटना घडल्यानंतर वन्यजीव विभागाने भीमाशंकर जंगलातील प्रेक्षणीय ठिकाणी फलक लावून जंगलातील सर्व वाटा बंद केल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी नेमून जंगलात फिरणा-या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भीमाशंकरचे मंदिरदेखील बंद आहे. तरी कोणीही भीमाशंकरकडे येऊ नये, असे अवाहन दिलीप भुर्के यांनी केले आहे.

भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ फाट्यावर वन्यजीव विभागाने लावलेला चेक पोस्ट.