शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या पैशातून मोतेवारचे ‘दगडूशेठ’ला दीड किलो सोन्याचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समृद्ध जीवन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समृद्ध जीवन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत. महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते.

धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवारने ठेवीदारांच्या पैशातून ‘दानधर्म’ केल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली होती.

समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को-ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात मोतेवारला सन २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे.

सीआयडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मोतेवारने पैशांचा वापर कोठे केला याचा शोध घेतला असता या दागिन्यांविषयी माहिती मिळाली. लोकांची फसवणूक केलेल्या पैशांतूनच त्याने हे दागिने घेतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती न्यासाशी संपर्क साधला. धर्मादाय आयुक्तांना हे दागिने तपास कामी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी न्यासाला तसे पत्र दिले. त्यानुसार ‘दगडूशेठ न्यासा’च्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करुन हे दागिने आमच्या ताब्यात दिले आहेत. यापूर्वी महेश मोतेवार यांच्याकडून ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत ‘दगडूशेठ न्यासा’चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “ गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही, अशी आमची भावना आहे. बाप्पाला कोणी काही अर्पण करत असेल, त्यावेळी तो कोण आहे, याची माहिती आम्हाला नसते. भावना आणि कायदा याच्यात गल्लत करता कामा नये. आम्ही कायदेशीर मार्गाने कार्य करतो. धर्मादाय आयुक्त हे आमचे प्रमुख आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्ही दागिने ‘सीआयडी’च्या ताब्यात दिले.”