शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा आईच्या अंगावर भुंकल्याने तरुणीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी या तरुणीला बेदम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी या तरुणीला बेदम मारहाण करून जखमी केले. कोथरूड पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय ४०, रा. म्हातोबानगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून डाव्या हाताची करंगळी पकडून जाेरात वाकवून त्यांना जबर दुखापत केली. त्यामुळे फिर्यादींचे शारीरिक व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी हा प्रकार घडला तेव्हा कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.