शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गलथान प्रशासनामुळे डॉक्टरांना फटका

By admin | Updated: July 19, 2015 03:50 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निषेध नोंदविण्यात आला.

- मंगेश पांडे,  पिंपरीपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निषेध नोंदविण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभागाच्याच गलथान कारभारामुळे अशा घटनांना डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. या रुग्णालयात शहरासह हद्दीबाहेरीलही रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव या तालुक्यांतील गावांमधील रुग्णांचा अधिक समावेश आहे. ओपीडीमध्ये दर दिवशी सुमारे बाराशे रुग्णांची तपासणी केली जाते. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यातच काही डॉक्टर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे कामकाजावर अधिकच ताण येत आहे. ओपीडीची वेळ १० ते १ असताना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तीन वाजेपर्यंत तपासणी सुरूच असते. कुठलाही रुग्ण आला, तरी त्यावर उपचार करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दर दिवशी रुग्णांची संख्या वाढतच आहे. शस्त्रक्रिया करण्यास उशीर केल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाने वायसीएममधील न्यूरोसर्जनला धक्काबुक्की केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. ही घटना घडण्यास अपुरे मनुष्यबळच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. धक्काबुक्की झालेले डॉक्टर न्यूरोसर्जन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असताना येथे केवळ एकच न्यूरोसर्जन आहेत. या आजाराचे अधिक रुग्ण असल्यास एका व्यक्तीला हा भार पेलणे शक्य होत नाही. या ताणातून डॉक्टर व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी वायसीएममधील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना, महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णाला तातडीने व चांगले उपचार मिळावेत, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. उपचार मिळण्यास उशीर झाल्यास अथवा रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यास नातेवाइकांनी संताप व्यक्त करणे स्वाभाविक आहे. परंतु, डॉक्टरांना धक्काबुक्की करणे हेदेखील योग्य नाही. रुग्णाला काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून अडचण सोडविण्यासाठी वेळीच पावले उचलायला हवीत. काही गंभीर प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असते. मात्र, सध्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडून अडचणी सोडविणे तर दूरच. ते वेळेत फोनही उचलत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. याच पदावर यापूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांचे अशा परिस्थितीवर लक्ष असायचे. रुग्णांशी संवाद, तसेच नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले जायचे. मात्र, ही बाब सध्याच्या अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून येते. (प्र्रतिनिधी)ओळखीवर मिळते चांगली सुविधा कामाचा प्रचंड ताण असल्याने कधीकधी येथील डॉक्टर रुग्णाकडे हवे तितके लक्ष देत नाहीत. मात्र, लोकप्रतिनिधींशी संबंधित असलेल्या अथवा ओळखीच्या रुग्णांची बडदास्त राखली जाते. येथे वशिलेबाजीवर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे अनेकदा सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागतो. डॉक्टर व नातेवाइकांमध्ये सुसंवाद हवारुग्णाच्या नातेवाइकांना डॉक्टरांकडून उपचाराची व्यवस्थित माहिती आणि मार्गदर्शन हवे असते. मात्र, अनेकदा डॉक्टर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नातेवाइकांशी व्यवस्थित चर्चा करीत नाहीत. यामुळे नातेवाईकदेखील संतापतात. डॉक्टरांनी नातेवाइकांशी सुसंवाद ठेवल्यास अनुचित प्रकार घडण्यास आळा बसेल. घटनेचा निषेध शस्त्रक्रिया करण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून वायसीएम रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ यांना भीमा थोरात या नातेवाइकाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या घटनेचा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी निषेध नोंदविला.तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फेही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच विविध संघटनांनीही निषेध केला आहे. दर दिवशी ओपीडीचे बाराशे ते पंधराशे रुग्ण असतात. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. बरेचसे डॉक्टर निवृत्त झाले आहेत. यामुळे कामकाजावर ताण येतो. अशातच रुग्णाच्या नातेवाइकांची समजून घेण्याची मानसिकता नसते. यातून अशा घटना घडत आहेत. - मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम