शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फ्लू लशीबाबत डॉक्टरही उदासीन

By admin | Updated: October 15, 2016 02:31 IST

स्वाईन फ्लू या आजाराचा उद्रेक काही वर्षांपासून देशात आणि राज्यात झालेला असताना सामान्य महिला आणि डॉक्टरांमध्येही या आजाराच्या

पुणे : स्वाईन फ्लू या आजाराचा उद्रेक काही वर्षांपासून देशात आणि राज्यात झालेला असताना सामान्य महिला आणि डॉक्टरांमध्येही या आजाराच्या लसीकरणाबाबत जनजागृती नसल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे या आजाराबाबत अद्यापही भारतात जागृती नसल्याचे मत सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंदवले आहे. महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद आणि स्विस ट्रॉपिकल अँड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार करण्यात आल्याचे संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक जणांचे शिक्षण हे दहावी किंवा त्याहून कमी असल्याचे संस्थांनी नोंदविले आहे. यातील अनेक जणी आपल्या बालकाच्या लसीकरणाबाबत जागृत होत्या, मात्र गरोदरपणात फ्लूची लस घ्यायची असते याबाबत त्यांना माहीत नसल्याचे आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी अनेकांनी आपल्याला फ्लूच्या लशीबाबत माहिती नसल्याने किंवा अर्धवट माहिती असल्याने आपण ही लस घेत नसल्याचे सांगितले.बहुतांश महिलांनी आणि त्यांच्या पतीने आपल्याला डॉक्टरांनी या लशीबाबत माहितीच दिली नसल्याचे सांगितले. याशिवाय डॉक्टरांमध्येही गरोदरपणातील फ्लू गंभीर आहे की नाही याबाबत संभ्रम होता. अनेकदा आपण दिलेला फ्लू लसीकरणाचा सल्ला गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याचे सांगितले. अनेक डॉक्टरांनी या लशीबाबत अनेक शंका असल्याने आपण आपल्या दवाखान्यात ही लस देत नसल्याचे सांगितले. पुण्यातील औंध, बाणेर, गोखलेनगर आणि कोथरूड भागातील १८ ते ३५ वयोगटातील ६० महिलांच्या सर्वेक्षणातून संस्थेने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. ६०पैकी ३० महिलांच्या जोडीदारांच्या मुलाखतींचाही या सर्वेक्षणात समावेश आहे. याशिवाय शहराच्या याच भागातील ३० डॉक्टरांच्याही यामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. काही वेळा फ्लू गंभीर रूप धारण करत असल्याने गर्भवती महिला आणि त्यांच्या बालकाचे फ्लूपासून रक्षण व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने फ्लू आजाराविरोधी लसीकरण करण्याची शिफारस केली होती. सन २००९मध्ये पुण्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीमुळे या आजाराचे प्रमाण गर्भवती महिला आणि बालकांमध्ये अधिक असल्याचे आढळून आले होते. (प्रतिनिधी)