शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: May 9, 2015 03:22 IST

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री २ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी आणलेल्या रुग्णाबरोबरच्या तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण केली.

बारामती : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री २ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी आणलेल्या रुग्णाबरोबरच्या तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण केली. त्याचबरोबर महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दहशत माजविली. रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मद्याच्या नशेत या आरोपींनी हा प्रकार केला. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण होते. मारहाण झालेल्या डॉक्टरांवर उपचार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून बाह्य रुग्ण विभागाच्या कामकाजावर वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला. रुग्णालयात असुरक्षिततेचे वातावरण आहे. आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामकाज केले जाणार नाही. रुग्ण तपासणी करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सकाळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. मात्र, आरोपींनी केलेल्या मारहाणीच्या निषेध सर्वच स्तरातून झाला. मेडिकोज गिल्ड या डॉक्टरांच्या संघटनेने आरोपींवर कारवाई करण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मारहाण झालेल्या डॉक्टरांची माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, डॉ. अशोक तांबे, नगरसेवक सुभाष ढोले, टि. व्ही. मोरे आदींनी विचारपूस केली. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपी बापू रावसाहेब आगम, रोहित केशव जगताप आणि अन्य एक साथीदार रुग्णालयात आले. त्यातील एकाला मद्याच्या नशेत गाडीवरून पडल्याने जखम झाली होती. त्याच्यावर उपचार करण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एन. तांबारे, प्रशिक्षणार्थी डॉ. महेश करे तातडीच्या उपचाराच्या खोलीत आले असता जगताप आणि त्याच्याबरोबरच्या जोडीदाराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, डॉ. करे, शिपाई असे चार ते पाच अधिकारी, कर्मचारी होते. आरोपींनी शिवीगाळ करून लवकर ड्रेसींग कर, असे म्हणत डॉ. करे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी, नर्स यांनी जवळच्या खोलीचा आश्रय घेतला. तो पर्यंत या आरोपींनी खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यामुळे घबराट पसरली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा डॉ. करे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या मागे कात्री घेऊन आरोपी धावले. दरम्यानच्या काळात शहर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीस येईपर्यंत आरोपींनी रुग्णालयातील काही वस्तुची नासधूस केली. त्याचबरोबर टेलिफोन फोडला. पोलीस येईपर्यंत आरोपी पळून गेले. या घटनेचा त्यांनी निषेध केला. त्याचबरोबर आरोपींवर तातडीने कारवाई करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. (वार्ताहर)