शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यास मज्जाव

By admin | Updated: June 1, 2016 00:51 IST

पांढरस्थळवस्तीमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेच्या पटांगणावर व परिसरात होणारे अतिक्रमण थांबविण्यास प्रशासन प्रयत्न करीत नाही

उरुळी कांचन : येथील पांढरस्थळवस्तीमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेच्या पटांगणावर व परिसरात होणारे अतिक्रमण थांबविण्यास प्रशासन प्रयत्न करीत नाही. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईला या शाळेला बक्षीसपत्राने दिलेल्या जागेचा वाद मिटविण्यात पंचायत समिती कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या वेळकाढूपणाला कंटाळून, येथील नागरिकांनी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ऊर्फ मारुती ज्ञानोबा कांचन यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा चालू शैक्षणिक वर्षात सुरू होऊ देण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, की परिसरातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी उरुळी कांचन येथील पांढरस्थळ वस्तीमधील (गट नं. ६९८, ६७८, ६८६ पैकी) काही जमीन बक्षीसपत्राद्वारे देण्यात आली आहे. परंतु ज्याने अतिक्रमण केले आहे, त्याच्या राजकीय व आर्थिक दडपशाहीला बळी पडून त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य नागरिकांच्या विशेष करून मागासवर्गीय पालकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून व त्याठिकाणी नियमाप्रमाणे मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे.या वर्षी जूनमध्ये सुरू होणारी शाळा आम्ही बक्षीसपत्राने भूमिदान करणाऱ्या मंडळीचे वारसदार या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई होत नसल्याने शाळा चालू होऊ देण्यास मज्जाव करणार आहोत.यासाठी प्रसंगी प्राणांतिक उपोषण करून तीव्र लढा देणार असल्याचा इशारा त्यांनी आपल्या निवेदनात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, तहसीलदार हवेली, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक), गटविकास अधिकारी हवेली यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी यांना दिला आहे, तसेच अतिक्रमण त्वरित हटवून ते करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब कांचन व इतरांनी केली आहे. (वार्ताहर)