शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विजय मल्ल्याप्रमाणे पळून नाही जाणार,आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार, पुन्हा भरारी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:51 IST

पुणे : गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे़ उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत़.

पुणे : गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही़ आता त्यातून बाहेर पडत आहे़ उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा आराखडा देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत़. विजय मल्ल्याप्रमाणे कोठेही पळून जाणार नाही, असे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके)यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले़डीएसके यांच्याविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे़ या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष हेही उपस्थित होते़ डीएसके म्हणाले, आम्ही १९८० पासून बांधकाम व्यवसायासाठी मुदत ठेवी घेत असून नोव्हेंबर २०१६ पर्यंत कोणाचेही पैसे बाकी नव्हते़ ड्रीम सिटीमुळे अडचणीत आलो आहे़ इस्रायली कंपनीबरोबर सोलापूर रोडला डायमंडचा सेझ प्रकल्प सुरू करणार होतो़ ५ वर्षात प्रकल्प उभा राहिला नाही तर शेतकºयांना जमीन परत द्यावी लागते़ त्यामुळे या जमिनी प्रथम डीएसके कुटुंबियांच्या नावावर घेतल्या. नंतर त्या कंपनीला ५ ते १० टक्के चढ्या भावाने विकल्याचे डीएसके यांनी कबुल केले़ मालमत्तेचा बँकांनी ताबा घेतला असला तरी बंद १३ गृहप्रकल्पाचे काम सुरू करत आहोत़ त्यातून २ हजार कोटी व ड्रीम सिटीतून १० हजार कोटी रुपये मिळतील. सर्व मालमत्तांची किंमत ९ हजार १२४ कोटी रुपये होत असून १५०० कोटींची देणीआहेत़ गुंतवणूकदारांचे नोव्हेंबर २०१७ अखेर १६५ कोटी रुपये देणेआहे़ २०२० पर्यंत मुदत ठेवींचे ५८९ कोटी रुपये द्यायचे असून दरमहा मुदत पूर्ण होणाºया ठेवीचे पैसे देण्यासाठी १५ कोटी रूपये लागतात़ त्याचा आराखडा उच्च न्यायालयाला देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.>राजकीय नेत्याने केला होता प्रयत्नआपली कंपनीत आर्थिक अडचणीत आल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने सुमारे १० महिन्यांपूर्वी गुंतवणूकदार शोधण्यासाठी प्रयत्न केला होता, असे सांगून डीएसके म्हणाले, ड्रीम सिटीपेक्षा पाचपट मोठे प्रकल्प करणाºया या व्यावसायिकाने मंदीमुळे गुंतवणूक करण्यास नकार दिला़ आता परदेशी गुंतवणुकदारच आमच्याकडे गुंतवणूक करू शकतात़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी