शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका

By admin | Updated: October 27, 2014 03:19 IST

लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले

पुणे : लोकसभा व विधासनभा निवडणुकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असून, पराभवातून सावरणाऱ्या नेतृत्वाची काँग्रेसला आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहराध्यक्ष लादू नका, अशी एकत्रित मागणी ब्लॉक अध्यक्ष करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसची पडझड थांबलेली नाही. शहरातील काँग्रेसच्या दिग्गज आमदारांचा पराभव झाला. त्यामुळे शहरातील आठही जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. संपूर्ण शहर व जिल्ह्यातील एकूण २१ जागांपैकी केवळ भोरची जागा वगळता काँग्रेसच्या उमेदवारांचा सर्व ठिकाणी पराभव झाला आहे. तर १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शहरातील सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही राहिले नाहीत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीने काँग्रेस नेतृत्वाने धोक्यांची घंटा ओळखली पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवून सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. गेल्या ८ ते १० वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व अ‍ॅड. अभय छाजेड यांच्याकडे होते. त्या काळात काँग्रेसने भरभराटही पाहिली अन् आता ओहोटी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून छाजेड यांनी राजीनामा दिला. मात्र, कॉँग्रेस अडचणीच्या काळात असताना त्यांनी राजीनामा न देता नेतृत्वाचे कसब दाखविणे गरजेचे आहे, अशी ब्लॉक अध्यक्षांची भावना आहे. पंडित नेहरू स्टेडियमचे ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, की पूर्वी लोकसभा, विधानसभा ते महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटप करताना ब्लॉक अध्यक्षांना विश्वासात घेतले जायचे. शहरातील आठ मतदारसंघांत १२ ब्लॉक अध्यक्ष ही काँग्रेसची खरी ताकद आहे. ती वाढविण्याचा प्रयत्न अभय छाजेड यांनी केला आहे. मे २०१५ ला लोकशाही मार्गाने निवडणुकी होईपर्यंत छाजेड यांनीच नेतृत्व केले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ब्लॉक अध्यक्षांची एकत्रित बैठक दोन दिवसांत होणार आहे. पर्वती ब्लॉकचे कार्याध्यक्ष सतीश पवार म्हणाले, काँग्रेसच्या पराभवातून कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी मनोबल वाढविणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारे खंबीर व सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (प्रतिनिधी)