शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अंध क्रिकेटपटूंवर अन्याय नको; लोकाश्रय मिळण्याची गरज

By admin | Updated: December 16, 2014 04:28 IST

कोणतेही यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असल्यावर निसर्गाने आणलेले अडथळे देखील दूर होतात.

महेंद्र कांबळे , बारामतीकोणतेही यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असल्यावर निसर्गाने आणलेले अडथळे देखील दूर होतात. याचीच प्रचिती बारामती तालुक्यातील अमोल दत्तात्रय करचे (रा. सदोबाचीवाडी) या २० वर्षीय अंध तरुणाने दक्षिण अफ्रिकेत नुकत्याच झालेल्या अंधाच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला नमवून वर्ल्डकप जिंकला आहे. अंधाच्या क्रिकेट संघाला लोकाश्रय मिळावा, अशी अपेक्षा त्याची आहे. अत्यंत हालाखीच्या कुटुंबातील जन्मत: अंधत्व असलेल्या अमोल याने पुण्यातील अंध शाळेत शिक्षण घेतले. तेथेच क्रिकेटचे धडे गिरवले. सुरुवातीला जिल्हास्तरीय संघात, त्यानंतर विभाग स्तरावर त्याची निवड झाली. उत्तरोत्तर त्याचा खेळ बहरत गेला. विभागस्तरावरून थेट राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट संघात त्याची निवड झाली. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या टी - २० अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघात त्याची निवड झाली. या स्पर्धेचे अजिंक्य पद देखील भारतीय संघाने पटकावले. त्यात अमोलची कामगिरी अष्टपैलू होती. त्यानंतर अंधांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. दक्षिण अफ्रिकेत चौथ्या ‘ब्लार्इंड वर्ल्डकप’ क्रिकेट स्पर्धेत देखील त्याने अष्टपैलू कामगिरी केली. सलग दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारताच्या अंध संघाने नमवले. विजेते पद पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजेत्या संघाचे कौतूक केले. प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस दिले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्याचे कौतूक केले. जागतिक स्तरावर खेळत असलेल्या अमोलच्या कामगिरीची माहिती गावात देखील नव्हती. वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावल्यानंतर गावकऱ्यांना समजले.भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा भारतीय क्रिकेटपटूंवर विविध संस्था, संघटना, उद्योगपतींनी व खेळाडूंच्या त्या त्या राज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता. अनेक खेळाडूंना महागडी घरे, मोटारी भेट देण्यात आल्या होत्या.मात्र अंध खेळाडूंना यातील काहीही मिळालेले नाही, हा फरक का? असा प्रश्न विचारला जात आहे.