शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

भावनिक होऊ नका, योग्य पर्याय निवडा

By admin | Updated: June 17, 2014 02:13 IST

दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये उत्साह आहे.

पुणे : दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये उत्साह आहे. मात्र त्याचबरोबर अपेक्षित गुण मिळतील का? याचे दडपणही त्यांच्या मनावर असते. निकाल हाती आल्यानंतर कमी गुण मिळालेले किंवा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी निराश होतात. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज असते. तो आधार पालक देऊ शकतात. तर अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अतिउत्साह न दाखविता योग्य मार्गदर्शन घेत विविध पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी व पालकांनी निकालानंतर भावनिक न होता, परिस्थिती स्वीकारून विविध पर्यायांचा सकारात्मक विचार करण्याचा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे. शालेय जीवनातून महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी. या टप्प्यावर किंबहुना त्या आधीपासूनच पालक आपल्या मुलांच्या करिअरचा विचार करतात. त्यादृष्टीने दहावी परीक्षेच्या निकालाला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून त्यांची पुढील दिशा ठरवली जाते. आज दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची उत्सुकता ताणली गेली आहे, तेवढेच दडपणही आहे. किती गुण मिळणार? हा एक प्रश्न सर्वांसमोर असणार आहे. मात्र, या प्रश्नाचे त्यांना अपेक्षित असलेले उत्तर मिळेलच असे नाही. काहींच्या पदरी निराशा येईल, तर काहींना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळतील. या दोन्ही स्थितीमध्ये काही विद्यार्थी व पालक भावनिक होऊन परिस्थितीही जुळवून घेण्यात अपयशी ठरतात. कोणताही विचार न करता निर्णय घेऊन मोकळे होतात. मात्र, तो निर्णय पुढे घातक ठरतो. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसह अपेक्षित गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही योग्य पर्यायांचा सारासार विचार करूनच निर्णय घेण्याची गरज आहे. यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समुपदेशकांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समुपदेशक प्रा. बी.डी. गरूड म्हणाले, दहावी हा करिअरच्यादृष्टीने मुलांचा पाया असतो. त्यामुळे साहजिकच अपयश आल्यानंतर मुले निराश होतात. मात्र त्यांनी धीर सोडू नये. भावनाशील न होता मुलांसह पालकांनी त्याचा स्वीकार करायला हवा. दहावीला दोन विषयांसाठी एटीकेटी असल्याने अशा विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोणतेही वाईट विचार मनात न आणता पर्यायांचा विचार करावा. यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचीही अनेकवेळा द्विधा मनस्थिती होते. पालकांनीही मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये.