शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल संदेशाने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

महावितरणाचे आवाहन : फसवणूक होण्याची शक्यता बारामती : महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे मोबाईल अ‍ॅप, महावितरण ...

महावितरणाचे आवाहन : फसवणूक होण्याची शक्यता

बारामती : महावितरणच्या ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे मोबाईल अ‍ॅप, महावितरण संकेतस्थळ तसेच युपीआय आदी पर्यायांचा वापर करावा किंवा नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावरच वीजबिल भरावे, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ऑनलाईन असल्याने वीजबिलाचे पैसे महावितरणला मिळताच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिल मिळाल्याचा संदेश प्राप्त होतो. ग्राहकांनी या संदेशाची पडताळणी करावी, अन्यथा मेसेज न मिळाल्यास ती फसवणूक असू शकते असे आवाहन असेही महावितरणने म्हटले आहे.

राज्यात ६५ लाख, तर बारामती परिमंडलात ४ लाख २४ हजार वीजग्राहक वीजबिल भरण्यासाठी विविध ऑनलाईन पर्यायांचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून महावितरणने वीज ग्राहकांसाठी आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी संकेतस्थळासह, मोबाईल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या अ‍ॅपद्वारे स्वत:च्या अनेक वीजजोडण्या हाताळता येतात. त्यामुळे दिवसेंदिवस वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी 'ऑनलाईन' वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे. त्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट सुद्धा देण्यात येते. ज्या ग्राहकांना ऑनलाईन पर्यायांचा वापर करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांची व्यवस्था केली आहे. बारामती परिमंडलात ११८९ अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे आहेत.

यामध्ये महावितरणाची ५२ , पतसंस्था २५२, सहकारी बँका ३१, जिल्हा बँकेची ६४१ व ईवॉलेटच्या २१३ भरणा केंद्रांचा समावेश आहे. या भरणा केंद्रांना महावितरणने अधिकृत सॉफ्टवेअर दिले असून, हे ऑनलाईन काम करते. त्यामुळे या सर्व केंद्रांवर जे ग्राहक पैसे भरतात त्यांना पावतीसोबत महावितरणतर्फे अधिकृत संदेश पाठवून पैसे मिळाल्याची पोहोच दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना खात्री पटते. काही ठिकाणी अनधिकृत व्यक्ती वीजबिल भरून देतो म्हणून पैसे ठेवून घेतात. गर्दीचे कारण सांगून ग्राहकांचे पैसे वापरल्याचे काही प्रकार समोर आल्याने महावितरणने अधिकृत भरणा केंद्रावरच वीजबिल भरणा करण्याचे किंवा स्वत:हून ऑनलाईनचा पर्याय निवडण्याचे व मोबाईल संदेशाद्वारे भरणा केल्याची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

---------------------