इंदापूर नगरपरिषदेने उभारलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्क नजीक, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये कवट, लिंब, काटेसावर व अर्जुन आदी प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण केले. वृक्षांची रोपे शहा नर्सरी इंदापूर यांच्याकडून मोफत देण्यात आली.
याप्रसंगी प्रहार अपंग संस्था जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, तालुकाध्यक्ष आनंदराव गायकवाड, उपाध्यक्ष बापू काळे, रामदास चव्हाण, सचिव दीपाली वाघमोडे, महिला तालुकाध्यक्ष सुक्षाला ढाणे, तालुका उपाध्यक्ष शोभा शिंगाडे, सचिव सचिन सूर्यवंशी, रहीम शेख, साहेब आत्तार, अंकुश पवार, दादा शिंदे, राजवीर कांबळे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब पाडुळे म्हणाले की, इंदापूरच्या विकासात शहा नर्सरीचा मोलाचा वाटा आहे.
इंदापूर शहरात व शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी शहा नर्सरीकडून नेहमीच मोफत वृक्ष देण्यात येतात. आजतागायत अनेक हजार झाडे शहा नर्सरीच्या माध्यमातून, झाडे जगवण्याचे हमीपत्र भरून मोफत देण्यात आली आहेत. त्यामुळे शहर हिरवेगार बनले आहे.
०५ इंदापूर वृक्षारोपण
इंदापूर बायोडायव्हर्सिटीनजीक वृक्षारोपण करताना दिव्यांग व इतर.