शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. सदस्यावर हल्ला!

By admin | Updated: November 3, 2015 03:28 IST

जमीनमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना रॉकेल टाकून तसेच दगडाने मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तर एकावर रॉकेल टाकण्याचा गंभीर

बावडा : जमीनमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना रॉकेल टाकून तसेच दगडाने मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तर एकावर रॉकेल टाकण्याचा गंभीर प्रकार सोमवारी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे घडला. बावडा येथील शेतकरी मारुती भिसे यांची शेतजमीन ढोले यांनी काही दिवसांपूर्वी विकत घेतली होती. त्या जमिनीची मोजणी करून ढोले यांना ताबा देण्यात येणार होता. त्यानुसार शासकीय मोजणीदार, सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मोजणी सुरू होती. या वेळी अचानक ढोलेविरुद्ध शेतकऱ्यांनी व भिसे यांच्या शेतात अतिक्रमण करणाऱ्यांनी समूहाने एकत्रित येऊन अडथळा आणला. त्याच वेळी एकाने ढोले यांच्या अंगावर फेकण्याच्या उद्देशाने रॉकेल डबा आणला. तसेच, इतरांनी दगड घेऊन ढोले यांचा पाठलाग केला. मात्र, प्रसंगावधान राखून ते त्यांच्या घरात गेल्याने हल्ल्यातून बचावले. या वेळी जमिनीचे मूळ मालक नागेश भिसे यांच्या अंगावर रॉकेल टाकण्यात आले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसात तक्रार दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी तत्काळ इंदापूरला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी २५ ते ३० जणांच्या विरोधात भिसे यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ढोले यांनी लाखेवाडी येथील ६ जणांपासून आपल्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी पत्र इंदापूर निरीक्षकांना दिले होते. पोलिसांवर आरोप....जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार घडत असताना सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी हस्तक्षेप केला नाही. उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहूनही फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोप त्यांनी केला.