शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By admin | Updated: May 4, 2015 03:18 IST

एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या

पुणे : एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी पेटीमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी रविवारी दिली. याबाबत माहिती देताना फळांचे व्यापारी युवराज काची म्हणाले, ‘‘रत्नागिरी हापूसची आवक वाढत आहे. शिवाय ग्राहकांची प्रमुख मागणी असलेला तयार आंबा बऱ्यापैकी उपलब्ध होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये दोन ते अडीच हजार पेट्यांची आवक झाली होती. आता रोजची आवक ५ हजार पेट्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच दरात घसरण झाली.’’दुसरीकडे कर्नाटक आंब्याची दैनंदिन आवकही ३५ ते ४० हजार पेटी आणि ७ हजार करंडी इतकी होत आहे. यामुळे कर्नाटक हापूसचे दर कमी झाल आहेत. ‘‘कर्नाटक हापूसच्या ३ ते ५ डझन पेटीस ६०० ते १२००, ३ ते ५ डझन पायरीला ५०० ते ८००, अडीच डझनाच्या पायरी करंडीस १५० ते २२०, ३ डझन लालबाग करंडीस १०० ते १५०, तर महाराष्ट्र केसरला प्रति किलो ४० ते ५० रुपये भाव आहे,’’ अशी माहिती कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. या आठवड्यात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम म्हणून कच्चा आंबा लवकर तयार होत आहे. त्यामुळे बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.