शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगारांंची शरद पवारांशी चर्चा

By admin | Updated: October 23, 2014 05:22 IST

: ऊसगाळप हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे.

सोमेश्वरनगर : ऊसगाळप हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यामध्ये संघटनेच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून येत्या चार दिवसांत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूकदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मात्र, मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान यांच्या संपाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मेखळी (ता. बारामती) येथे संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील, पदाधिकारी आश्रुदास कराड, बबनराव पाले, बाबासाहेब घायतोडक, रामदास पानवळ यांच्याशी संपाबाबत अर्धा तास चर्चा केली. या वेळी पवार यांनी संघटनेच्या विविध मागण्या समजून घेतल्या. तसेच, यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये कारखाना व संघटना यांच्यातील सामंजस्य करार संपून गेला आहे. ऊसतोडणी कामगारांना ऊसतोडणीमध्ये वाढ करावी, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीमध्ये वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, राज्यातील प्रत्येक कारखान्याने ऊसतोडणी कामगारांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरावा, मुकादमांच्या २० टक्के फरक बिलातील कमिशन द्यावे, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना निवासी आश्रमशाळा चालू कराव्यात, करारानुसार टायर बैलगाडीवर १० टक्के कमिशन आकारणी ठरलेली आहे. प्रत्यक्षात कारखाने २० टक्के आकरतात. उर्वरित पैसे परत मिळावेत. ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्याकडून कपात केला जाणारा २ टक्के प्राप्तिकर करू नये, ऊसतोडणी कामगारांना शासनाने पक्की घरे बांधून द्यावीत, त्यांना अड्याच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईट पुरवावी, मुकादमांना राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात यावीत. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीत आरक्षण द्यावे आदी मागण्यांविषयी शिष्टमंडळाची पवार यांच्याशी चर्चा झाली. (वार्ताहर)