शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीसाठी ‘सवलत’नामा

By admin | Updated: February 15, 2017 02:24 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील दहा लाखांहून अधिक प्रवाशांचा भार वाहणाऱ्या बससेवेवर सवलतींचा वर्षाव करीत सर्वच राजकीय पक्षांनी

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील दहा लाखांहून अधिक प्रवाशांचा भार वाहणाऱ्या बससेवेवर सवलतींचा वर्षाव करीत सर्वच राजकीय पक्षांनी या सेवेच्या सक्षमीकरणाचे स्वप्न पाहिले आहे; पण आधीच शेकडो कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) या सवलती आणखी खिळखिळ्या करू शकतात, याचा विचार कुणीही केलेला दिसत नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्यात आल्याचे जाहीरनामा व वचननाम्यातील घोषणांवरून दिसते.पालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा व शिवसेना या पक्षांनी विविध जाहीरनाम्यातून विविध घोषणांचा पाऊस पाडला आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, मेट्रो, सांस्कृृतिक, पर्यावरण अशा विविध मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश आहे. पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांतील लाखो प्रवाशांसाठी वरदान असलेल्या पीएमपी बससेवेचाही त्यामध्ये स्वतंत्र उल्लेख आहे. प्रत्येक पक्षाने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, विविध घटकांसाठी मोफत, सवलतीत प्रवास देण्याची घोषणा केली आहे; मात्र या घोषणा करताना त्यासाठी लागणारा निधी कसा आणि कुठून उपलब्ध करणार, याचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणतीही ठोस योजना त्यामध्ये देण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या काही कामांचा उल्लेखच त्यामध्ये दिसतो.पीएमपीला दररोज सर्व प्रकारचे सुमारे दीड ते पावणे दोन कोटीचे उत्पन्न मिळते. तरीही दर वर्षी १५० ते २०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. संचलनात येणारी तूट दोन्ही पालिकांकडून भरून काढली जाते. हा अतिरिक्त ताण पडत असल्याने हे पैसेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेकदा कामगारांचे वेतन रखडण्यापर्यंतची नामुष्की पीएमपी प्रशासनावर आली आहे. ठेकेदारांना पैसे देता-देताही नाकीनऊ येते. पालिका; तसेच पीएमपीकडून कर्जाद्वारे काही बसची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, नव्याने सुरू करण्यात आलेल्या नोकरभरतीचाही बोजा दोन्हींवर पडणार आहे. अशा परिस्थितीत बसचा मोफत प्रवास, बसभाडे कमी करणे, मासिक पासमध्ये सुट अशा सवलत देण्याच्या योजना पीएमपीसाठी मारक असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पीएमपीने ‘बिझनेस प्लॅन’साठी घेतलेल्या कार्यशाळांमध्ये प्रवाशांनी मोफत किंवा सवलतीच्या प्रवासापेक्षा सुरक्षित व दर्जेदार सेवेची मागणी उचलून धरली होती. खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातही प्रवाशांचे हेच म्हणणे असल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)