पुणो : गेली अनेक वर्षे जिल्हा समाज कल्याण कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असणा:या अपंगांच्या विशेष शाळेतील कर्मचा:यांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. अपंग शाळेतील कर्मचा:यांच्या नियुक्तीवर अपंग कल्याण आयुक्तालयाने मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे एकाच शाळेतील कर्मचा:याला वर्षभरापेक्षा अधिक काळ प्रतिनियुक्तीवर घेता येणार नाही.
अपंगांच्या विशेष शाळेतील कर्मचा:यांची नियुक्ती अपंग कल्याण आयुक्तालयासह जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागात करण्यात येत आहे. लिपिकापासून ते वैद्यकीय सामाजिक कार्यकत्र्याची (एमएसडब्लू पदवी प्राप्त) देखील प्रतिनियुक्तीवर नेमणुक केली जात होती. परिणामी शाळांच्या कामकाजावर देखील विपरीत परिणाम होत होता. या बाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. तसेच चालू शैक्षणिक वर्षापासून प्रतिनियुक्त कर्मचा:यांना पुन्हा मूळ ठिकाणी रुजू करावे या मागणीसाठी संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
त्या पाश्र्वभूमीवर अपंग कल्याण आयुक्तालयाने जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. अपंगांच्या विशेष शाळांमध्ये विशिष्ट उद्देशाने पदभरती करण्यात आलेली असते. मात्र असे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असल्याने संबंधित शाळांतील कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे लिपिक अथवा इतर कर्मचा:यांना प्रतिनियुक्तीवर घेताना एकाच शाळेतील कर्मचा:याची नियुक्ती
करु नये. आळीपाळीने प्रत्येक शाळेतील कर्मचा:याची नियुक्ती करावी. तसेच एकाच व्यक्तीची वर्षभरापेक्षा अधिक कालावधीसाठी नियुक्ती करु नये, वैद्यकीय समाजिक कर्यकत्याला आठवडय़ातील तीन दिवस संबंधित संस्थेत काम करण्याची परवानगी द्यावी असे पत्र अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाठविले आहे. तसेच जिल्हा परिषदेत अनेक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या विद्या देशपांडे यांना वानवडीच्या अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेत पाठविण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत.
4अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर, मतिमंद अशा विविध प्रवर्गातील विद्याथ्र्याना व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणो, कल्याणकारी योजनांचा प्रसार करण्याची जबाबदारी वैद्यकीय समाजिक कार्यकत्र्याची असते. असे अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेतल्यास संबंधित शाळांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. कर्मचा:यांची प्रतिनियुक्ती करताना या बाबींचा विचार झाला पाहिजे असे संयुक्त अपंग हक्क
सुरक्षा समितीचे शिंदे यांनी सांगितले.