शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम मतदारयाद्यांत फरक

By admin | Updated: February 16, 2017 03:35 IST

महापालिका निवडणुकीची आयोगाने जाहीर केलेले अंतिम मतदारयादी व त्यानंतर निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली केंद्रनिहाय यादी

पुणे : महापालिका निवडणुकीची आयोगाने जाहीर केलेले अंतिम मतदारयादी व त्यानंतर निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली केंद्रनिहाय यादी यामध्ये मतदारांच्या अनुक्रमांकात फरक असल्याची तक्रार राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. आयोगाच्या वतीने मात्र या तक्रारीत तथ्य नसून यादी बरोबरच असल्याचा दावा करण्यात आला आहे.महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदारयादीचा आधार घेण्यात आला आहे. त्यातील नावांची दुरूस्ती व अन्य कारणांसाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार दुरूस्त्या करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात प्रभाग रचना नव्याने जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय यादी जाहीर करण्यात आली.त्यातही दुरूस्त्या करून प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी जाहीर झाली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांचा मतदारयादीतील अनुक्रमांक म्हणून या अंतिम मतदार यादीमधील क्रमांक दिला आहे. प्रभागातील मतदान केंद्रनिहाय यादी त्यानंतर जाहीर करण्यात आली. ती जाहीर करताना मतदारांच्या अनुक्रमांकात बदल झाले असल्याची तक्रार करण्यात येत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव महेश महाले यांनी वतीने सांगितले, की केंद्रनिहाय यादी जाहीर करताना त्यात केंद्र क्रमांक १ मतदार अनुक्रमांक १ ते ८००, केंद्र क्रमांक २, मतदार अनुक्रमांक ८०१ ते पुढे असे आहे. प्रत्यक्षात केंद्रनिहाय यादी म्हणून जी यादी देण्यात आली आहे, त्यात मात्र केंद्र क्रमांक १ मतदार अनुक्रमांक १ ते ८००, केंद्र क्रमांक २ मतदार अनुक्रमांक पुन्हा १ ते ८०० असे देण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणार असल्याचे महाले यांचे म्हणणे आहे. अन्य काही राजकीय पक्षांचीही याचप्रमाणे तक्रार आहे. (प्रतिनिधी)