शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

असे आखावे मुलांचे आहाराचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न ...

जागतिक अन्न सुरक्षा दिवस ७ जून रोजी साजरा केला जातो. अन्नातील पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्यादृष्टीने अन्न सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांचा दररोजचा आहार कसा आणि किती असावा, पोषक घटकांचे प्रमाण किती असावे याबाबत पालक बारकाईने विचार करत असतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असताना आहाराच्या बाबतीत अधिक सजग राहण्याची गरज गरज आहे.

आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, ''एका पोळीमध्ये साधारण ३ ग्रॅम, एक कप दुधात ४ ते ५ ग्रॅम, तर एक वाटी डाळीमध्ये ५ ग्रॅम प्रथिने असतात. प्रत्येकाच्या घरातील पोळीचा प्रकार, वाटीचा आकार वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे आहाराचे प्रमाण ठरवायला हवे. केवळ कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे मुलांचा आहार आणि व्यायाम यावर भर देणे गरजेचे आहे.''

--------------

*आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तक्ता*

वयोगट वजन (किग्रॅ) कॅलरी (प्रतिदिन)

०-६ महिने ५.८ ५३०

६-१२ महिने ८.५ ६६०

१ ते ३ वर्षे १२.९ १११०

४ ते ६ वर्षे १८.३ १३६०

७ - ९ वर्षे २५.३ १७००

१० ते १२ वर्षे (मुले) ३४.९ २२२०

१० ते १२ वर्षे (मुली) ३६.४ २०६०

१३ ते १५ वर्षे (मुले) ५०.५ २८६०

१३ ते १५ वर्षे (मुली) ४९.६ २४००

१६ ते १८ (मुले) ६४.४ ३३२०

१६ ते १८ (मुली) ५५.७ २५००

-----------

वयोगट प्रोटिन (ग्रॅम प्रतिदिन)

०-६ महिने ७

६-१२ महिने ९

१ ते ३ वर्षे १०

४ ते ६ वर्षे १३

७ - ९ वर्षे १९

१० ते १२ वर्षे (मुले) २७

१० ते १२ वर्षे (मुली) २७

१३ ते १५ वर्षे (मुले) ३६

१३ ते १५ वर्षे (मुली) ३५

१६ ते १८ (मुले) ४५

१६ ते १८ (मुली) ३७

-----------

मुलांची उंची, वजन, वय, लिंग यानुसार पोषक आहाराची गरज ठरते. दही, दूध, डाळी, तृणधान्ये यातून शरीराला प्रथिने मिळतात. मुलांना सर्वंकष आहार देण्यावर पालकांचा भर असायला हवा. हंगामी फळे, सुका मेवा यांचा आहारातील समावेश लाभदायक ठरतो. आजकाल मुलांमध्ये स्थूलतेची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. जंक फूड, कमी झालेली शारीरिक हालचाल ही त्यामागील कारणे आहेत. फास्ट फूड आणि जंक फूडने केवळ वजन वाढत नाही, तर प्रतिकारशक्तीही कमी होते. कृत्रिम पदार्थांमुळे पेशींवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आहारात नैसर्गिक पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. हिरव्या पालेभाज्या या ''स्टोअर ऑफ न्यूट्रियनट्स'' मानल्या जातात. त्यामुळे मुलांना आवर्जून पालेभाज्या खाण्याची सवय लावावी.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ