शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगासह सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण

By admin | Updated: November 15, 2015 00:39 IST

देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही,

बारामती : देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगक्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली.बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांचा मेळावा आयोगित करण्यात आला होता. पवार म्हणाले, की देशात शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारची धोरणे पोषक नसल्याने निराशेचे वातावरण झाले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी परदेशी गुंतवणुकीला विरोध केला. मात्र, आता त्यांनीच परदेशी गुंतवणूुकदारांना संधी दिली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. याचा परिणाम रिटेल क्षेत्रावर होऊन दुकाने बंद होण्याची भीती आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत सोने, वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. गुंतवणुुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबाबत एका वर्षात निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, एका वर्षात प्रोत्साहन देणारी दिशा दिसत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)