शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर भरण्यात उदासीनता

By admin | Updated: May 23, 2016 02:10 IST

शहरामध्ये मोबाइल कंपन्यांकडून हजारो टॉवरची उभारणी करून त्याचा मिळकतकरच भरला जात नसल्याने महापालिकेने टॉवरसाठी जागा भाड्याने देणाऱ्या १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

पुणे : शहरामध्ये मोबाइल कंपन्यांकडून हजारो टॉवरची उभारणी करून त्याचा मिळकतकरच भरला जात नसल्याने महापालिकेने टॉवरसाठी जागा भाड्याने देणाऱ्या १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, यापैकी एकाही जागामालकाने अद्याप मिळकतकर भरलेला नाही. त्यामुळे पालिका त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून विचारला जात आहे.शहरात एकूण २ हजार ४४५ मोबाइल टॉवर आहेत. त्यांपैकी केवळ १५२ मोबाइल टॉवर अधिकृतपणे परवानगी घेऊन उभारण्यात आले आहेत. उर्वरित २ हजार ३०२ मोबाइल टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे मिळकतकराची ३०० कोटीपेक्षा जास्त रकमेची थकबाकी आहे. मोबाइल कंपन्यांना ही थकबाकी भरण्यास सांगितले असता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याला स्थगिती आणली आहे. मात्र पालिकेने मोबाइल टॉवरच्या मिळकतकराची वसुली मोबाइल कंपन्यांकडून न करता जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकाकडून वसूल करावी, असा अभिप्राय विधी विभागाकडून देण्यात आला. मिळकतकर विभागाने त्यानुसार शहरातील १ हजार ८०० घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र अद्याप एकाही घरमालकाने मिळकतकराची थकबाकी भरलेली नाही. घरमालकांना नोटिशीनुसार दिलेली मुदत संपली आहे. त्यानुसार पालिकेने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे. सर्वसामान्य नागरिकांनी मिळकतकर न भरल्यास त्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून वसुलीची कारवाई पालिकेकडून केली जाते, तर कोट्यवधींचा मिळकतकर न थकविणाऱ्या मोबाइल कंपन्यांवर पालिकेची मेहरनजर का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे.