शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दातांचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST

तुम्हाला माहीत आहे का? दातांवरील कडक आवरण आपल्या शरीरातील हाडांपेक्षा मजबूत असते, जे आपल्या दातांना नेहमी सुरक्षित ठेवते. एकदा ...

तुम्हाला माहीत आहे का?

दातांवरील कडक आवरण आपल्या शरीरातील हाडांपेक्षा मजबूत असते, जे आपल्या दातांना नेहमी सुरक्षित ठेवते. एकदा त्यांची झीज झाली तर ती कधीही भरून निघत नाही. आपल्या तोंडामध्ये लाळ असल्याने दातांचे आरोग्य चांगले राहण्यास व अन्नपचनासाठी ती महत्त्वाचे काम करते.

आरोग्य चांगलं रहावं म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याबाबी आवश्यक असल्या तरी दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. त्यामुळे दातांची सुरक्षा अन् सुरक्षेसाठी दातांचे विकार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे दातांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. बाळाचे दात हे अत्यंत महत्त्वाचे असतात. लहानपणीच त्यांची काळजी घेतली तर दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

दातांची स्वच्छता आणि आपला आहार दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतो.

दातांची काळजी कशी घ्यावी.

१) टूथब्रश (दात घासण्याचा ब्रश) :

-मीडियम व मऊ, खूप कडक नसावा

-दर तीन महिन्यांनी ब्रश बदलावा

-वापर करून झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून तो पूर्णपणे ड्राय होईल.

-घरातील सर्वांच्या ब्रशबरोबर एकदम चिटकून आपला ब्रश ठेऊ नये.

-फ्लू किंवा सर्दी, तापासारखे आजार होऊन गेल्यानंतर आपला ब्रश बदलावा.

-हाताने वापरायचे ब्रश बॅटरी, ऑपरेटेड ब्रश स्वच्छ आणि चांगले असतात.

टूथपेस्ट :

-ब्रँड आणि फ्लेव्हर्डचा विचार करता सर्व टूथपेस्टपासून मिळणारा फायदा समान आहे. आपल्याला जी पेस्ट सूट करत असेल ती वापरावी.

-दोन मिनिटांचा नियम नक्की पाळा.

-दिवसातून दोनदा ब्रश करा आणि दात घासल्याशिवाय कधीही झोपायला जाऊ नका. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि वाटते तितके कठीणही नाही.

-ब्रश करताना आपली जीभही स्वच्छ करा.

२) फ्लॉस :

लोकांचा असा समज आहे की, फ्लॉसमुळे दातांच्या मधली जागा वाढते. ते हिरड्यांसाठी वाईट आहे, त्याचबरोबर रक्तस्राव होतो. फ्लॉसमुळे दातांच्यामधील अन्नकण साफ करण्यास मदत होते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्याचा वापर कसा योग्य पद्धतीने करायचा हे जाणून घेऊ शकता.

३) दैनंदिन आहारही दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा

- दिवसभरात भरपूर पाणी प्या.

-साखरयुक्त आहार प्रमाणात घ्या.

-ऍसिडिक सॉफ्ट ड्रिंक, कोक, स्प्राईट याचा कमीत कमी वापर करावा.

- कडक फळे व भाजीपालायुक्त आहार असावा.

-तोंड स्वच्छ धुवा.

५)आपल्या दंत चिकित्सकाला वर्षातून दोनदा भेट देऊन दातांच्या आरोग्याविषयी जाणून घ्या. दातांची कीड ही जोपर्यंत त्रास देत नाही, तोपर्यंत ती खोलवर जात नाही. आणि कालांतराने वेदना असह्य झाल्याने रूट कॅनाल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. जे खर्चीक असते. खरं तर सुरुवातीपासून लक्ष दिले, योग्य काळजी घेतली, तर इथपर्यंत जाण्याची वेळ येतच नाही. मुळात दंतवैद्यकीय उपचार हे महाग नसतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले तर ते महाग होतात हे निश्चित !

- डॉ. तरविन कौर