शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंगीचा उद्रेक

By admin | Updated: August 1, 2014 05:23 IST

शहरात आज दिवसभरात डेंगीचे ५१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जुलै महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या ६३० वर पोहोचली आहे

पुणे : शहरात आज दिवसभरात डेंगीचे ५१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जुलै महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या ६३० वर पोहोचली आहे. यावरून शहरात डेंगीचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंगीमुळे पुणेकरांचे आरोग्य संकटात आलेले असताना पुणे महापालिका मात्र अजूनही कीटकनाशक खरेदीतच अडकली आहे. अजूनही पालिकेला आवश्यक असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करता आलेली नाही. यावरून येत्या काही दिवसांत शहरात डेंगीची स्थिती अधिक तीव्र होईल, हे स्पष्ट झाले आहे.यंदाच्या वर्षात एका महिन्यात डेंगीचे ६३० रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. यामध्ये दोन व्यक्तींना आपला जीवही गमावावा लागला आहे. जून महिन्यात शहरात डेंगीचे २४९ रुग्ण सापडले होते. त्याअगोदर या रुग्णांची संख्या महिनाकाठी ५०च्या आत होती. महत्त्वाचे म्हणजे, डेंगीचा उद्रेक या वर्षीच शहरात झालेला नाही. त्याअगोदर सलग दोन वर्षे पुण्यामध्ये डेंगीने थैमान घातले आहे. त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण त्यातून कोणताही धडा पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेला नाही. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीच्या काळातच त्यांची वाढ रोखण्यासाठी ज्या कीटकनाशकांच्या फवारणीची आवश्यकता आहे, तीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडील कीटकनाशके संपल्याच्या बातम्या वेळोवेळी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने तातडीने महिन्याभरापूर्वी औषधखरेदी केली. त्यात धूर फवारणीसाठी लागणारे पायरॅथम, जलपर्णीनाशक ग्लायसोफेट आणि जेथे रुग्ण सापडले, त्या भागातील घरांमध्ये औषधफवारणी करण्यासाठी वापरले जाणारे ब्रायफ्रेन्थीम ही कीटकनाशके घेण्यात आली. पण सध्या शहरामध्ये डासांची पैदास होत असल्याने त्यांना रोखण्यासाठी अळीनाशक टेमिफॉस व बीटीआय या कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात ही औषधेच घेण्यात आलेली नाहीत. राज्यशासनाच्या दरानुसार ही कीटकनाशके देण्यास कोणतीही कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे पालिकेने शॉर्ट टेंडर लावले आहे. मात्र, त्याचे काम अगदी संथगतीने सुरू आहे. यामुळे शहरात डासांचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. लवकर ही औषधे आली नाही तर शहरातील स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)