शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढतोय डेंग्यूचा विळखा

By admin | Updated: September 14, 2014 00:03 IST

गेल्या आठवडाभरात या आजाराची लागण तब्बल 213 जणांना झाली आहे.

पुणो : शहरातील डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने कडक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली असली, तरी गेल्या आठवडाभरात या आजाराची लागण  तब्बल 213 जणांना झाली आहे.  आज दिवसभरात डेंग्यूची लागण झालेले 32 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 
गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2क्77 वर पोहोचली आहे, तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ात ही रुग्णांची संख्या 466 वर पोहोचली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या पावसामुळे ठिकठिकाणी डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणावर डास निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी ओलावा असेल तेथे या डासांची उत्पत्ती होते. हे डास नागरिकांना चावले की प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो. या आजारामुळे रुग्णाला त्वरित उपचार न मिळाल्यास तो दगावू                    शकतो.                    (प्रतिनिधी) 
 
4घरातील पाणीसाठय़ाच्या पृष्ठभागाला एडिस डासाची अंडी चिकटलेली असल्याने पाण्याच्या संपर्कात आल्यास डासांची पैदास होते. या डासांची पैदास झाल्यास डेंग्यू आजार होतो. त्यामुळे नागरिकांनी घरात जास्त वेळ पाणी साठू देऊ नये. तसेच, कुंडीमध्ये पाणी साठू देऊ नये, फ्रीज व एअर कंडीशन यांच्या मागील ट्रेमधील पाणी सतत बदलावे, छपरातील पाण्याची जाळी सतत तपासावी त्यात पाणी साठू देऊ नये, ड्रम, बॅरेल, कॅन यांना झाकण लावावे, पाणी सतत वाहते ठेवणो, भंगार साहित्य टेरेस व इतर परिसरात ठेवू नये, टाकी, हौद, रांजण यांना नेहमी झाकण लावावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
डास आढळणा:या ठिकाणांना भेटी 
4दरम्यान, पालिकेच्या वतीने डेंग्यूचे डास आढळणा:या ठिकाणांना भेटी दिल्या जात आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दिवसेंदिवस शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ज्या परिसरात डेंग्यूचा रुग्ण आढळेल, त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.