शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चौदा दिवसांत डेंगीचे ८२ रुग्ण

By admin | Updated: November 15, 2015 01:14 IST

गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात थैमान माजविणाऱ्या डेंगीने यंदाही डोके वर काढले असून, या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात थैमान माजविणाऱ्या डेंगीने यंदाही डोके वर काढले असून, या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यात गेल्या १४ दिवसांमध्ये डेंगीची लागण झालेले तब्बल ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. यावरून पुणे महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै ते फेब्रुवारी या ८ महिन्यांच्या कालावधीत शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांतील चित्र आहे. त्यामुळे डेंगीच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अशी स्थिती आहे. पावसाळ्यानंतर शहरात डेंगीचा उद्रेक होत असून, ती आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. यंदा तरी पुण्यात डेंगीची साथ येणार नाही, अशी आशा पुणेकर करीत होते; मात्र पावसाळा संपण्याअगोदरच डेेंगीने शहरात डोके वर काढल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जून या काळात महिन्याकाठी दहा-अकरा असे असणारे रुग्ण जुलै महिन्यापासून मात्र सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यात डेंगीचे ७५ रुग्ण सापडले. आॅगस्ट महिन्यात त्याची संख्या वाढून ती १५६ वर पोहोचली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २९० आणि आॅक्टोबरमध्ये तब्बल ३६० रुग्ण सापडले आहेत.नोव्हेंबर महिन्यात अवघ्या १४ दिवसांत डेंगीची लागण झालेले तब्बल ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. गेल्या तीन वर्षांपासून डेंगीचा उद्रेक होत असल्याने पालिकेकडून यंदा तरी ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी आशा पुणेकर करीत होते. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहून पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.