शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अष्टविनायक विकास आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

नारायणगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण अशा दोन भागात सुमारे २४५ कोटी ५२ लाख रकमेच्या ...

नारायणगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण अशा दोन भागात सुमारे २४५ कोटी ५२ लाख रकमेच्या आराखड्याला सन २०१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आराखड्याला पर्यटन विभागाने मंजुरी द्यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी या संदर्भात राज्यमंत्री तटकरे यांना पत्र पाठवले असून सन २०१६ मध्ये ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेने राज्यातील अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला होता. पायाभूत सुविधा व सुशोभिकरण अशा दोन भागात सुमारे रु. २४५ कोटी ५२ लक्ष रकमेच्या या आराखड्याला सन २०१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्याच्या पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, अष्टविनायक गणपतींपैकी लेण्याद्री, ओझर, रांजणगाव व थेऊर ही चार देवस्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघात असून दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक या देवस्थानांना भेट देतात. या भाविकांना, पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकर मंजूर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असून पालकमंत्री अजित पवार यांनी आजवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत भरीव निधी मिळेल, याची खात्री आहे.