शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यास विलंब

By admin | Updated: November 17, 2015 03:21 IST

मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कार्पोरेशनकडून (डीएमआरसी) करण्यात येत आहे.

पुणे : मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कार्पोरेशनकडून (डीएमआरसी) करण्यात येत आहे. डीएमआरसीकडून हा अहवाल पूर्ण होण्यास आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडे मेट्रोचा सुधारित अहवाल पाठविण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी वनाझ ते रामवाडी या मार्गाचा मेट्रोचा सुधारित अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना पुणे महापालिकेला केल्या होत्या. दिवाळी सुट्ट्या व इतर कारणांमुळे डीएमआरसीकडून अद्याप खर्चाचा सुधारित आराखडा तयार होऊ शकलेला नाही. पुढील सोमवारपर्यंत डीएमआरसीकडून तो महापालिकेला मिळू शकेल. त्यानंतर महापालिकेकडून तो केंद्राकडे पाठविला जाणार आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील मेट्रो पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती; आता ती नदीकाठावरून वळविण्यात आली आहे. पूर्वीच्या मार्गामध्ये ३०० मीटरचा बदल झाला आहे. त्याबाबतचा बदल आराखड्यात केला जात आहे.अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले, ‘वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा जो जुना आराखडा केला होता, त्यामध्ये झालेल्या खर्चाच्या वाढीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल. त्यानंतर तो अहवाल केंद्राला पाठविला जाईल.’मेट्रोचा सुधारित आराखडा केंद्राकडे सादर झाल्यानंतर कॅबिनेटकडे सादर होण्यापूर्वी तो पीआयबीकडे जाणार आहे. तिथे त्यांची काटेकोर तपासणी झाल्यानंतरच त्याला कॅबिनेटची मान्यता मिळू शकणार आहे. त्याचबरोबर मेट्रोची कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. ही प्रक्रिया वेगाने व्हावी याकरिता पुणे महापालिकेकडून सुधारित आराखडा लवकर सादर होणे आवश्यक आहे.