शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा

By admin | Updated: August 21, 2014 23:47 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मिळणारे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले,

 भोर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मिळणारे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले, करारावर (तात्पुरते) नेमलेल्या डॉक्टरांना पगार नाही, डिङोलअभावी रुग्णवहिका बंद, औषध खरेदी होत नाही, सोनोग्राफी मशिनही बंद आणि तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. ही स्थिती आहे भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाची. 

येथे आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे 
रुग्णांचे हाल होत आहेत.  रुग्णकल्याण समितीने निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
इतरांना आरोग्य सुविधा देणारे रुग्णालयच अत्यवस्थ होऊन सलाईनवर आले आहे.
लोकांना मोफत 
आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासनाने 2क्क्1/2 साली सुमारे दीड 
कोटीची इमारत बांधून ग्रामीण आरोग्य केंद्राचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले. 5क् खाटांची सोय करण्यात आली. रुग्णालयात चालकपद रिक्त, कक्ष सेवकपद, दोन सफाई कर्मचारीपद रिक्त, 7 डॉक्टरांची नेमणूक आहे, मात्र 4 पदे रिक्त असून, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. नेमणूक केलेले स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था आहे. 
रुग्णकल्याण समितीने निधीबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही शासनाचे वरिष्ठ आधकारी दुर्लक्ष करीत असल्याचे रुग्णकल्याण समितीचे सदस्य सारंग शेटे व गजानन शेटे यांनी सांगितले. 
या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था आरोग्य केंद्रासारखी झाली आहे.  शासनाचा भोंगळ कारभारात सर्वसामान्य रुग्ण मात्र भरडतोय. याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. (वार्ताहर)
 
4मागील 8 महिने राष्ट्रीय ग्रमीण अभियानांतर्गत मिळणारे अनुदान न मिळाल्याने 11 महिन्यांच्या करारावर असणारे वैद्यकीय अधिकारी व शालेय आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांना 8 महिने पगार नाही. 
4पगार नसल्याने चालक काम सोडण्याचा विचारात आहे. निधी नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात सफाई कर्मचारी कामावर घेता येत नसल्याने सर्वत्र घाणीचे सामाज्य निर्माण झाले आहे. 
4सोनोग्राफी मशिन बंद असल्याने रुग्णांची तपासणी करता येत नाही. निधी नसल्याने दुकानातून औषधे खरेदी होत नाही.  त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे  विकत घ्यावी लागतात.