शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देहू देऊळवाडा उजळला

By admin | Updated: November 16, 2015 01:48 IST

श्री संत तुकाराममहाराज मंदिराच्या आवारात सुमारे दीड हजार तेलाच्या वातींचे दिवे जाळून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज मंदिराच्या आवारात सुमारे दीड हजार तेलाच्या वातींचे दिवे जाळून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या जीवनातील ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रसंगावर सुंदर रांगोळी काढली होती.यंदाही संस्थानच्या वतीने दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. मंदिराच्या ओवऱ्या, जोते, दीपमाळा, पायऱ्यांवर दिवे लावण्यात आले होते. येथील शीतल मोरे, मधुरा मोरे, प्राची मोरे, प्रियंका मोरे, कोजागिरी मोरे, सायली काळोखे यांनी मंदिर परिसरात रांगोळ्या काढल्या. रांगोळ्यांच्या भोवती पणत्या लावण्यात आल्या होत्या. गावातील व पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दीपोत्सव झाल्यानंतर आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर पेढे वाटून आनंद साजरा केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनील दिगंबर मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) वाकडमधील कामगारांना मदतवाकड : परिसरातील स्वच्छता कामगारांना नगरसेवक विनायक गायकवाड यांच्याकडून कपडे व मिठाई वाटली. कार्यालयीन अधीक्षक गणेश विपट, अतिक्रमण निरीक्षक अजय सिन्नरकर,अतिक्रमण सहायक जगन्नाथ काटे आदी उपस्थित होते. या वेळी ३२ कामगारांना साडीचोळी आणि मिठाई दिली. (प्रतिनिधी)सजावटीत दंगवाकड : येथील मनपा शाळेत बालवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवीत दिवाळी साजरी केली. किल्ला बनविणे, घरकुल सजावट, कागदी फटाके बनविणे आदी विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका शोभा सूर्यवंशी, सुंनदा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)