शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरातील अतिक्रमणे हटवली

By admin | Updated: August 20, 2016 05:14 IST

शहरात शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या वेळी अतिक्रमण केलेले चायनीज, खाद्यपदार्थ, वडापाव-भेळीचे

बारामती : शहरात शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या वेळी अतिक्रमण केलेले चायनीज, खाद्यपदार्थ, वडापाव-भेळीचे हातगाडे जप्त करण्यात आले. कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पुनावाला गार्डनसमोरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली.मुख्याधिकारी नीलेश देशमुख, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या उपस्थितीत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली. नगरपालिका प्रशासन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी विरोध केला. तसेच सिनेमा रोडवरील पदपथावर व्यापाऱ्यांनी मांडलेल्या मशीन नगरपालिका प्रशासनाने या वेळी जप्त केल्या. या कारवाईबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले, की अडथळ्यांमुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अडथळा ठरणारे हातगाडी आदी काढण्यात आले. फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी नवीन हद्दीत हॉकर्स झोन केले आहेत. त्यामध्ये फेरीवाले, पथारी व्यावसायिकांचे निश्चित पुनर्वसन करण्यात येईल. कारवाई सुरूच राहणार आहे. वाहतूक ठप्प होणारे अडथळे काढताना कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘‘व्यावयायिकांना हटवून अतिक्रमण काढणे चुकीचे आहे. २०१३ मध्ये बारामती नगरपालिकेने १० ‘हॉकर्स झोन’ जाहीर केले होते. त्यातील पहिला हॉकर्स झोनच पुनावाला गार्डनसमोर आहे. २०१३ मध्ये फेरीवाला विधेयक मंजूर करण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला हातगाडी, पथारीवाल्यांना भारतीय संविधानातील कलम १९ (१) नुसार व्यवसायाचा मूलभूत हक्क आहे. कारवाई न थांबल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा, आंदोलन करण्यात येईल. तसेच न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावणार आहे.- काळुराम चौधरी, प्रदेश सचिव (बसपा)