शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचार वाढल्याने झाला हा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरी महिलांवर झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरी महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला तक्रार स्पष्टपणे मांडण्यास पुढे येत नाहीत, अशा वेळी पोलीस ठाणे पातळीवर महिला दक्षता समिती अशा पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरण करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक रश्मी जाधव यांनी हे आदेश काढले आहेत.

दक्षता समितीतील महिला सदस्य या कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली नसाव्यात, असे सुचविण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या एक वर्षापासून अशा समितीच्या बैठका घेणे बंद झाले होते. त्या पुन्हा सुरू करण्याचे सूचविण्यात आले आहे.

महिला दक्षता समिती पोलीस ठाणे व परिमंडळ स्तरावर पुनश्च कार्यान्वित करण्यात यावी. या महिला दक्षता समितीचा उद्देश हा महिलांच्या संदर्भात विशेषत: विवाहित महिलांच्या अनुषंगाने त्यांच्या संसारात होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबद्दल इतर अत्याचारासंदर्भात पोलीस ठाणे स्तरावर पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत करेल. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सदस्य असाव्यात. समितीमध्ये १० महिला सदस्या असाव्यात.

पोलीस ठाण्याच्या स्तरावर दर आठवड्यामध्ये किमान एकदा महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून व त्यांच्या समक्ष अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलावून घटनेच्या संदर्भामध्ये माहिती घ्यावी व तत्काळ त्यांचे निवारण करावे. जर कौटुंबिक वाद-विवाद यांचे निराकरण पोलीस ठाणे स्तरावरील समितीमध्ये झाले नाही, तर ते प्रकरण हे परिमंडळ पोलीस अधिकारी स्तरावर कार्यरत असणाऱ्या समितीसमोर ठेवण्यात यावे.

महिला दक्षता समिती ही पोलीस ठाण्याच्या स्तरावर काम करीत असताना फक्त विवाहित महिलांच्या संदर्भातच चर्चा करण्यात येऊ नये, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलांच्या अनुषंगाने दाखल होणारे छेडछाडीचे गुन्हे, महिलांवरील लैंगिक अत्याचारावरील गुन्हे व पोलिसांनी कोणती व काय कारवाई केली आहे? व काय करणे अपेक्षित आहे. दक्षता समिती सदस्यांची काय भूमिका आहे, यावरही चर्चा व्हावी़

चौकट

कोरोना संसर्गामुळे मार्च-२०२० मध्ये पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर, महिला दक्षता समितीसह सर्व समित्यांच्या बैठका घेणे बंद करावे लागले होते. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनेत याकाळात काही समस्या असेल, तर समितीतील सदस्य महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी फोनवरून सहकार्य घेण्यात येत होते. आता पुन्हा समितीच्या बैठका सुरू करण्यात येतील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.