शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST

पुणे : एसटी महामंडळातील निवृत्त अधिकारी यशवंतराव दिनकर थिटे (वय ९५, नव सह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) यांचे निधन झाले. ...

पुणे : एसटी महामंडळातील निवृत्त अधिकारी यशवंतराव दिनकर थिटे (वय ९५, नव सह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महामंडळाच्या सांस्कृतिक विभागातील नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. त्याबरोबरच दिग्दर्शन करून अनेक बक्षिसे मिळवली. त्याबरोबरच त्यांना गडकिल्ले भटकंती व इतिहासाची आवड होती. गाव तिथे एसटी या तत्त्वासाठी खेड्यापाड्यांत गाडी पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

कमलबाई राऊत

पुणे : कमलबाई बबनराव राऊत (वय ८४, रा. घोरपडे पेठ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. हिराबाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिलीप राऊत तसेच महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत यांच्या त्या काकी होत.

माधवी जोशी

पुणे : माधवी विश्वजित जोशी (वय ५५ रा. बी. टी कवडे रस्ता, घोरपडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

शमशुद्दीन मुजावर

पुणे : शमशुद्दीन जम्मालउद्दीन मुजावर (वय ७१, रा. पेरणे ) यांचे सोमवारी निधन झाले. ते वीज मंडळाच्या सिव्हिल विभागात कार्यरत होते. त्यांनी भारतीय मजदूर संघाचे काम केले. निवृत्त झाल्यावर ते ज्येष्ठ कामगार महासंघात क्रियाशील होते. त्यांना दत्तोपंत ठेंगडी यांचा विशेष स्नेह लाभला.

सखाराम चौधरी

पुणे : सखाराम श्रीपती चौधरी (वय ७९, रा. येनपुरेनगर, धनकवडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. ते एसपी महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय सेवानिवृत्त सेवक होते. भोर तालुक्यातील बाजारवाडी गावातून स. प. महाविद्यालयात सेवा बजावली. ते माजी कर्मचारी व विद्यार्थिसंघाचे मार्गदर्शक होते.

सुभाष इंगवले

पुणे : सुभाष बाबूराव इंगवले (वय ७३, रा. सदाशिव पेठे) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलाग, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शहेनाझ शेख

पुणे : शहेनाझ आब्दुलकरीम शेख (वय ५६, रा. चौफुला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जयंत कवी

पुणे : जयंत पुरुषोत्तम कवी (वय ६४, रा. फणी आळी, कसबा पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, सून असा परिवार आहे. ते फणी आळी तालीम मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार होते.

सुमन भाडाळे

पुणे : सुमन रोहिदास भाडळे (वय ५६, रा. सदाशिव पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुवर्णा लुनावत

पुणे : सुवर्णा राजेंद्र लुनावत (वय ५६, रा. कोंढवा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलाग, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या लोकमत सखी मंचच्या समन्वयक अरुणा पारसचंद गटागट यांच्या नणंद होत.