शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव यांचे निधन चटका लावणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजीव सातव म्हणजे हात आकाशाला टेकले तरी पाय जमिनीवरच ठेवणारे दुर्लभ नेते होते. त्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राजीव सातव म्हणजे हात आकाशाला टेकले तरी पाय जमिनीवरच ठेवणारे दुर्लभ नेते होते. त्यांचे असे अकाली जाणे चटका लावणारे आहे, अशा शब्दात पुण्यातील काँग्रेसजनांंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शहर काँग्रेस समितीच्या वतीने सोमवारी दुपारी काँग्रेस भवनमध्ये सातव यांच्यासाठी शोकसभा घेण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम ते नेहमी करायचे. आजच्या काळात पक्षाला त्यांची गरज होती. त्यांचे असे अकाली जाणे धक्का देणारे आहे.

प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांंनी सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, आबा बागुल, कमल व्यवहारे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, अमिर शेख यांनी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या.

नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे तसेच दत्तात्रय बहिरट, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, साहिल केदारी, बाळासाहेब अमराळे, शिलार रतनगिरी, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सकट, अनिस खान, राजेंद्र मराठे, सौरभ अमराळे व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.