शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2014 04:13 IST

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील एका तरुणाचा विद्युत रोहित्राच्या धक्क्याने मृत्यू झाला.

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील एका तरुणाचा विद्युत रोहित्राच्या धक्क्याने मृत्यू झाला. वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर बाजारपेठेतील दगडे डॉक्टरांच्या पाठीमागील व ग्र्रामपंचायतशेजारील असलेल्या विद्युत रोहित्राचा धक्का बसून अल्ताफ आदम मुलाणी (वय २१, रा. वालचंदनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १४) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या तरुणास गणेश बनसोडे याने अप्पा बेडवे याच्या मदतीने लासुर्णे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी सहा वाजता अल्ताफ मुलाणी मरण पावला. या घटनेची खबर वालचंदनगरचे फिरोज गफूर मुलाणी (वय ३७) यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला दिली. .कडेठाणला शेतकऱ्याचा मृत्यूवरवंड : कडेठाण (ता. दौंड) परिसरात विजेच्या धक्क्याने वसंत पवार (वय ६४, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार केशव जगताप यांनी दिली. शुक्रवारी (दि.१३) रात्री ८ च्या सुमारास वसंत पवार हे आपल्या शेतामध्ये कामकाजासाठी गेले होते. तेव्हा शेतात विद्युत तारा खालवर लोंबलेल्या होत्या. त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने या तारांचा धक्का वसंत पवार यांना लागल्याने ते तारांना चिकटल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदरच्या तारा लोंबलेल्या अवस्थेत आहे. (वार्ताहर)